सोलापूर,(प्रतिनिधी):- जुना एम्प्लायमेंट चौकातील ध्रुव हॉटेलचे मालक अजिं्नय राऊत (वय 55) यांनी गुरूवार दि. 3 ऑगस्ट रोजी त्यांच्या राहत्या घरी विजापूर रोड इंदिरा नगर येथे स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.
ध्रुव हॉटेलच्या बाजुला असलेल्या घराचे बांधकाम सुरू असल्याने ते काही दिवसापुर्वी विजापूर रोड परिसरातील इंदिरा नगर येथे राहण्यास गेले होते. ते काही दिवसापासून आजारी असल्याने त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. गुरूवारी दुपारी ते घरी असताना अचानकपणे गोळीचा आवाज आला आणि त्यांच्या गळ्यातून रक्तस्त्राव सुरू होवून ते बेशुध्द झाले. बेशुध्दावस्थेत त्यांना नातेवाईक मित्रांनी अश्विनी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या ध्न्नयाने त्यांची पत्नीही बेशुध्द झाली त्यांनाही अश्विनी हॉस्पिटल मध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती कळताच विजापूर नाका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली असता गोळीबार झाल्याच्या काही खुणा आढळून आल्या. अजिं्नय राऊत यांच्याकडे एक रिव्हॉल्वर होती त्याचा परवानाही त्यांच्याकडे होता. त्यातूनच त्यांनी त्यांच्या गळ्यावर गोळी मारून आत्महत्या केल्याचे प्राथमिक अंदाज पोलीसांनी व्यक्त केला. त्यांनी स्वत:वर गोळी मारून आत्महत्या का केली, काय कारण आहे आत्महत्येचे हे मात्र अद्याप समजले नाही. अजिं्नय राऊत यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यासाठी मृतदेह सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे पोलीसांनी पाठवून दिला असून शवविच्छेदन शुक्रवारी सकाळी होण्याची श्नयता आहे. याबाबतची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.