सोलापूर महानगरपालिकेतील गलिच्छ वस्ती सुधारणा विभागातील सहाय्यक अभियंता यांना 13 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास रंगेहात पकडल्याची माहिती मिळत आहे. सुनील लामकाने असे त्या अभियंत्याचे नाव असून त्याला अँटी करप्शन विभागाने ताब्यात घेऊन सदर बजार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केलो आहे.
अँटी करप्शन ब्युरोचे अधिकारी तसेच पोलीस लामकानें यांच्या घरी जाऊन तपास सुरू केल्याचे दिसून आले. दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार हे ठेकेदार असुन त्यांनी महानगरपालीका सोलापूर हद्दीत शेळगी ते स्मशानभुमी येथे केलेल्या डांबरी रस्त्याचे मोजमापे पुस्तकावर माहे डिसेंबर मध्ये सही करुन दिल्याचा मोबदला म्हणुन ६,०००/- रुपये व बारामती बँक ते आकाशगंगा मंदीर येथील डांबरी रस्ताचे मोजमापे पुस्तकावर सही करण्यासाठी ७,०००/- रुपये असे एकुण १३,०००/- रुपयेची मागणी करुन सदर लाच रक्कम महानगरपालीका सोलापूर इमारतीमधील स्वतः च्या कक्षामध्ये स्वतः लाच रक्कम स्विकारले असता रंगेहात पकडण्यात आले. लामकाने हे सोलापूर महापालिकेच्या गलिच्छ वस्ती सुधारणा योजना विभागात ते कार्यरत होते, यापूर्वी झोन अधिकारी, पाणी पुरवठा विभागात त्यांनी काम केले आहे.