राज्यात अनेक ठिकाणी हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. सोलापूर शहराला मागील काही दिवसांपासून उकाड्याने हैराण केले होते. दिवसभर कडक ऊन सायंकाळी पाचच्या सुमारास आकाशात ढग जमा होऊन वारा सुटायचा मात्र पाऊस काही आला नाही.
शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते, दुपारी साडेचारच्या सुमारास मात्र आकाशात ढग दाटून आले, वादळी वारा सुरू झाला, विजेच्या कडकडाट सुरु झाला आणि जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. पाऊस इतका जोरदार होता की समोरचे काहीच दिसत नव्हते. या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी झाडे उन्हाळून पडली आहेत.