राजधानी दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दिल्ली आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता 5.8 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे.देशाची राजधानी दिल्लीत मंगळवारी (24 जानेवारी 2023) दुपारच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. दुपारी 2 वाजून 28 मिनिटांच्या आसपास हे भूकंप जाणवले आहेत. दिल्लीसोबतच दिल्ली एनसीआर, उत्तरप्रदेश आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊ येथेही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.
जवळपास दोन मिनिटांपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी ने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता आणि भूकंपाची तीव्रता 5.8 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. जमीनपासून 10 किमी खोलीवर हा भूकंपाचा केंद्रबिंदू होता.