सोलापूर l अखिल भारतीय विद्यापीठ संघटनेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य महविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस डॉ. आर. बी. सिंह हे शनिवारी सोलापुरात येत आहेत. महाविद्यालय व विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या शासनाकडून मान्य झाल्याने कॉलेज कर्मचारी युनियन सोलापूरच्या वतीने कृतज्ञता मेळावा होत आहे.या मेळाव्यास ते मार्गदर्शन करणार आहेत.
हा मेळावा शनिवारी ( दि. ५) दुपारी तीन वाजता छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजच्या हॉलमध्ये होणार आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील महाविद्यालय आणि विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष राजेंद्र गोटे, विभागीय सचिव अजितकुमार संगवे, कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले, सरचिटणीस राजेंद्र गिड्डे व खजिनदार राहुल कराडे यांनी केले आहे.