मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आज ओंकारेश्वर येथे हिंदू संत आदि शंकराचार्यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले . ओंकारेश्वर हे खांडवा जिल्ह्यातील नर्मदा नदीच्या काठावर वसलेले मंदिर आहे. भगवान शिवाला समर्पित 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ओंकारेश्वर येथे आहे.आठव्या शतकातील तत्त्वज्ञानी आणि हिंदू धर्मात पूज्य असलेल्या शंकराचार्यांच्या 108 फूट उंच पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी असे नाव देण्यात आले आहे. नर्मदा नदीच्या काठी नयनरम्य मांधाता टेकडीवर ही विशाल मूर्ती आहे.
आचार्य शंकर कल्चरल इंटिग्रेशन ट्रस्ट आणि मध्य प्रदेश राज्य पर्यटन विकास महामंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू संत आदि शंकराचार्यांची ही मूर्ती तयार करण्यात आली आहे. शंकराचार्यांचे हे अद्भूत शिल्प सोलापूरचे अद्भूत शिल्पकार भगवान रामपुरे यांनी साकारले आहे. शंकराचार्यांचा जन्म केरळमध्ये झाला असे म्हटले जाते. त्यांनी बालपणीच संन्यास घेतला. संन्यास घेऊन ते ओंकारेश्वरला पोहोचले. त्यांनी येथे चार वर्षे शिक्षण घेतले. धार्मिक मान्यतेनुसार, अद्वैत वेदांत तत्त्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शंकराचार्य वयाच्या १२व्या वर्षी ओंकारेश्वरहून देशाच्या इतर भागात गेले.