Monday, July 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

लतादीदी…. आवाजही पहचान है

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 21, 2023
in entertainment
0
लतादीदी…. आवाजही पहचान है
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पार्श्वगायक व गीतकार यांना जी पारितोषिके मिळतात ती कोणाच्या हट्टामुळे सुरु झाली?
गाण्याच्या रेकाॕर्डवर चित्रपटांच्या कथेतील पात्राऐवजी गायकाचे नाव येणे कोणाच्या गाण्यामुळे सुरु झाले?
पार्श्वगायकांना राॕयल्टी मिळत असल्यास कोणाच्या पुढाकाराने मिळू लागली?
या तीनही प्रश्नांचे एकच उत्तर आहे ते म्हणजे लता मंगेशकर !

आज लतादीदी जाऊन दीड वर्षापेक्षा जास्त काळ लोटला,पण असा एकही दिवस गेला नसेल की आसमंतात त्यांचा स्वर दरवळला नसेल! जिवंतपणीच आख्यायिका होण्याचं भाग्य ज्यांना लाभलं आहे,त्या लोकांमध्ये लता मंगेशकर यांचा क्रमांक खूप वरचा असणार !आज जरी लता मंगेशकर आपल्यात नसल्या,तरी त्यांच्यासंबंधित एवढिशीही बाब ही वृत्त वाहिन्यांसाठी आणि वर्तमानपत्रांसाठी अजुनही फार मोठी बातमी असते.संंगीताच्या सुवर्णयुगाचा विचार केला तर लतादीदी या हिंदी चित्रपटसृष्टीच्या कायमच प्रथम क्रमांकाच्या गायिका होत्या.त्या हिंदीत इतक्या व्यस्त होत्या की मराठी चित्रपटांसाठी फार कमी उपलब्ध असायच्या.

आणि लता प्रथम क्रमांकाची गायिका होती हे वाक्य दुसरे तिसरे कोणी नाही तर साक्षात ओ पी नय्यर यांंनीच एका मुलाखतीत म्हटल्यामुळे प्रश्नच मिटला!(वादाचा!) ते म्हणाले होते,”Let me say this once and for all,and remember I am swearing this on my food, –even though I never worked with Lata,I still consider her as the number one singer in India!”

आणि हा प्रथम क्रमांक तिने कधीपासुन टिकवून ठेवला असणार ?1950 पासून !आत्तासारखी जीवघेणी स्पर्धा तेंव्हाही होती.अगदी सुरुवातीला लता शंभर दोनशे रुपये एका गाण्याचे मानधन घेत असताना शमशाद बेगम एका गाण्याचे एक हजार घेत असे .ज्या स्थानावर शमशाद ला पोचायला साठ महिने लागले तिथे लता बारा महिन्यातच पोचली.अंदाज 1948चा,बरसात 1949चा! बरसात च्या अकरा पैकी दहा गाण्यात लताचा आवाज होता.आणि सगळीकडे बरसात च्या गाण्यांची धूम होती.ये तो सिर्फ उनके आनेका आगाज था!एकेका सिनेमात आठदहा गाणे केवळ लताचे असे खूप सिनेमे पुढेयेणारहोते.नागिन,अलबेला,आह,
अनारकली,मदर इंडिया ते आत्ता आत्ता 1994 चा हम आपके है कौन मध्ये अकरा गाणी,तर 1997 च्या दिल तो पागल है मध्ये सुध्दा आठ गाणी लताची होती !काही सिनेमात तर सर्व च्या सर्व गाणी फक्त लताची !दुसरा स्वरच नाही.विश्वास बसत नसल्यास ही यादी नजरेखालून घाला.आम्रपाली ,पुनम,औरत,
पट्टरानी आणि मराठीत वादळ.आठच्या आठ गाणी केवळ लताची!अनारकली मध्ये सी.रामचंद्र यांंनी” जमाना ये समझा के हम पी के आये” हे लताची उचकी असलेले गाणे टाकले,आणि ते गाणे चित्रपटाचे हायलाईट ठरले!आणि त्यावर विख्यात संपादक बाबूराव पटेल यांंनी त्यांच्या वृत्तपत्रात गमतीने लिहिले की लता मंगेशकरने नुसती जांभई द्यायचा अवकाश की सी. रामचंद्र लगेच तिला राग दरबारी म्हणतील आणि ती धून एखाद्या निर्मात्याला खपवतील!

लताने मराठी चित्रपटसृष्टीत जरी फारसे गायले नसले तरी आधी वसन्त प्रभू व नंतर ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या संगीतात भावगीते,भक्तीगीते भरपूर गायली.वादळ(1953)हा लता मंगेशकर निर्मित चित्रपट ज्याचे संंगीत वसन्त प्रभू यांचे होते.यातील एका ठुमरीला नागपूरात वन्समोअर मिळायचा!लक्षात घ्या,चालू सिनेमात वन्समोअर!आणि मग पुन्हा ते गाणं दाखवलं जायचं! पुढे साठच्या दशकात काही चित्रपटांना स्वतः लतादिदींनी आनंदघन नावाने संगीत दिलं.”ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी,अखेरचा हा तुला दंडवत,रेशमाच्या रेघांनी आणि शूर आम्ही सरदार आम्हाला ” ही चार गाणी लतादीदी संगीतकार म्हणूनपण किती प्रतिभावंत होत्या हे दाखवायला समर्थ आहेत.नंतर पुढे लतादिदींनी डोलकर डोलकर सारखी कोळीगीतं,ज्ञानेश्वरी शिवकल्याणराजा हे केलं. याचे संगीतकार हृदयनाथ मंगेशकर होते.असं सगळं सुरु असताना अचानक संत तुकारामांच्या अभंगांसाठी संगीतकार म्हणून श्रीनिवास खळे कुठून आले,हे काय गौडबंगालआहे ते ह्रदयनाथांकडून ऐकण्यात मजा आहे.ते म्हणतात,” दिदी एक दिवस म्हणाली,बाळ,मला आनंदाचे डोही आनंद तरंग ,वृक्षवल्ली आम्हा सोयरी इ.तुकारामांचे अभंग करायचे आहेत पण श्रीनिवास खळेंबरोबर!

मग मी त्याप्रमाणे खळेंना भेटायला गेलो आणि त्यांना तसे सांगितले. त्यावर खळे मला म्हणाले,”ह्रदयनाथ ,तुम्ही स्वतः संगीतकार,दिदींबरोबर ज्ञानेश्वरी तुम्हीच केली,आणि आता म्हणता तुकारामांच्या अभंगांचं संगीत मी करु? सकाळी सकाळी गम्मत करायला तुम्हाला दुसरं कोणी मिळालं नाही का?” आणि तेंव्हा खळेंना पटवता पटवता माझी पुरेवाट झाली की अहो दिदींचीच ही इच्छा आहे.”

लताकडे संपूर्ण दुर्लक्ष करणारा ओ पी नय्यर सारखा एकमेव सन्माननीय अपवाद वगळता बाकी सर्वच संंगीतकारांनी आपल्या निवडक उत्कृष्ठ संगीतरचना केवळ लतासाठीच राखून ठेवल्या होत्या .अमुक एक गाणे तू संध्या मुखर्जी ला दिलं होतस का या निरुपद्रवी प्रश्नावर सज्जाद उसळून बोलला होता की हम किसी संध्या और सुबह को नही जानते.हम सिर्फ लतासे गँवाते है! लता आणि आशा यांच्याबद्दल आरडीबर्मन म्हणाले होते,लता ही ब्रॕडमन आहे तर आशा म्हणजे गार्फिल्ड सोबर्स आहे ,आॕलराऊंडर!!

काही वर्षांपूर्वी संंगीतकार प्रभाकर जोग यांनी लिहिलेला एक लेख वाचण्यातआला.त्यात ते म्हणतात,”१९६७ मध्ये मला एक सिनेमा करायला मिळाला होता ,”थांब लक्ष्मी कुंकू लावते”.त्यातील दोन गाणी ,शुभंकरोती म्हणा आणि घेऊ कसा उखाणा ही लताबाईंनी गावी अशी इच्छा होती.पण सांगणार कसे?पण माझ्या व्हाॕयलिन वादकाकडून ती त्यांच्या पर्यंत पोचली .होकार आला. रेकाॕर्डिंग ठरलं त्या आल्या .गाणं समजून घ्यायला त्यांना काही मिनिटेच पुरली.शुभंकरोती म्हणा हे गाणं सुंदरच झालं .कोरस म्हणून जी लहान मुले होती त्यांच्या साठी त्यांनी मोठ्या कॕडबरी बोलवल्या.त्यावेळी त्या एका शिफ्ट मध्ये एकच गाणं करायच्या म्हणून त्यांना राहिलेल्या दुसऱ्या गाण्यासाठी दुसरी डेट विचारली .त्या म्हणाल्या आत्ताच करु .आणि घेऊ कसा उखाणा पण रेकाॕर्ड झालंं. आनंद व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नव्हते.बिदागीची विचारणा केल्यावर,”छे छे इतक्या गोड गाण्याचे कोणी पैसे घेतात का” असे म्हणून लतादीदी त्यांच्या गाडीत जाऊन बसल्याही!इतक्या थोर गायिकेने दिलेली ही दाद आठवली की आजही डोळ्यात पाणी येतं.”

कलाकाराची कारकिर्द चढउतारानी भरलेली असते. लतादीदी मात्र याला अपवाद म्हणाव्या लागतील.त्यांच्या करीअरचा ग्राफ कधी खाली आलाच नाही.स्वेच्छेने त्यांनी पुढे पुढे गायन कमी केले.तरीही निर्माते त्यांच्यासाठी थांबायला कायम तयार असायचे.इतरांनी गायलेली गाणी नंतर लताच्या आवाजात डब केल्याची चिक्कार उदाहरणे मिळतील,पण लताने गायलेले गाणे काढून इतर कोणाकडून गाऊन घेतल्याची नोंद आढळत नाही. .1983 ची गोष्ट असावी .लताचे परदेश दौरे ही नित्याचीच बाब झाली होती .लताने फिल्मी गायन कमी करायला आणि परदेश दौरे वाढवायला सुरुवात केली होती. पण काही संंगीतकार लताची वाट पहाणार्यांपैकी होते.एलपी म्हणजे लक्ष्मीकांत-प्यारेलाल त्यातलेच.लता जेंव्हा परदेश दौर्यावरुन परतून रेकाॕर्डिंग ला आली तेंव्हा तिला दुसऱ्या गायिकेच्या आवाजात डब केलेले गाणे ऐकवण्यात आले.एलपी सांगतात ,लता म्हणाली”इतकं छान तर गायले आहे तिने,माझ्या आवाजात पुन्हा कशाला करता?दुसरे गाणे करु या.”
आणि मग दुसरे गाणे रेकाॕर्ड झाले. पहिले गाणे चित्रपटात तसेच ठेवले गेले.ते होते हिरो सिनेमाचे अनुराधा चे तू मेरा जानू है जे पुढे सुपरहीट झाले!म्हणजे दुसरे गाणे जे लताने गायले ते निंदिया से जागी बहार असणार!

सलिल चौधरी म्हणतात ,”लताबरोबर काम करताना मला फक्त आकाशाचीच मर्यादा होती,कोणताही गायक किंवा गायिका तिच्या आसपास सुद्धा फिरकू शकत नव्हते.लता माझ्यासाठी जे गाते त्याचं मुख्य तत्त्व आहे अतर्क्यता!लतासाठी मी ज्या संंगीत रचना सिद्ध केल्यात,त्यापैकी एकाचीही अस्ताई ऐकल्यानंतर तुम्हाला त्याचा अंतरा कसा असेल, याचा अंदाजही येऊ शकणार नाही,असे माझे आव्हान आहे (खरच आहे हे !ओ सजना वरुन तुमको पुकारे मेरे किंवा ऐसे रिमझिम मे चा अंदाज आला होता?)तुम्ही जर ते ओळखू शकलात तर मग लता मंगेशकर सारख्या अभूतपूर्व गायिकेने गायलेल्या गाण्यांचे, त्यांच्या चालीचे,
स्वतःचे असे स्वाभाविक मुल्य ते काय राहिलं!”

हेमन्तकुमार म्हणाले होते,”मी किती भाग्यवान आहे की एखाद्या शुष्क कोरड्या शतकात माझा जन्म झाला नाही!लता मंगेशकर ज्या शतकात आहे त्याच सुरेल शतकात मीही आहे”.हेमन्तकुमार यांच्याच सूरात सूर मिसळून आपणही सांगू शकतो,की आज जरी लतादीदी नसल्या तरी त्यांच्या गाण्यांनी आमचं जीवन समृध्द झालेलं आहे.त्या गाण्यांचं वैभव,ती श्रीमंती आमच्याकडे आहे!

अभय कुलकर्णी
9270049979
(लेखक चित्रपट आणि चित्रपटसंगीताचे अभ्यासक आहेत.)

Post Views: 81
Previous Post

चंद्रपूर : २ तासात धो-धो पाऊस बरसला इरई धरणाचे २ दरवाजे उघडले…..

Next Post

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आदी शंकराचार्यंच्या यांच्या १०८ फूट उंच अशा भव्यदीव्य पुतळ्याचे अनावरण

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आदी शंकराचार्यंच्या यांच्या १०८ फूट उंच अशा भव्यदीव्य पुतळ्याचे अनावरण

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आदी शंकराचार्यंच्या यांच्या १०८ फूट उंच अशा भव्यदीव्य पुतळ्याचे अनावरण

ताज्या बातम्या

भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात बायोमेडिकल अभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक्रम उपलब्ध: अध्यक्ष  रवींद्र डी.  गायकवाड 

भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात बायोमेडिकल अभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक्रम उपलब्ध: अध्यक्ष  रवींद्र डी.  गायकवाड 

July 26, 2026
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे भव्य दिव्य दिंडी सोहळा उत्साहात 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे भव्य दिव्य दिंडी सोहळा उत्साहात 

July 26, 2026
शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शारीरिक शिक्षण शिक्षकांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शारीरिक शिक्षण शिक्षकांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

July 26, 2026
जेन झी’च्या माध्यमातून हरवलेला जनाधार मिळवण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न-हेमंत पाटील

जेन झी’च्या माध्यमातून हरवलेला जनाधार मिळवण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न-हेमंत पाटील

July 26, 2026
ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे यांचा ॲड. उज्ज्वल निकम यांच्याहस्ते सत्कार

ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे यांचा ॲड. उज्ज्वल निकम यांच्याहस्ते सत्कार

July 26, 2026
अभिनव सामाजिक संस्थेने काढली महापुरुषांच्या विचारांची दिंडी

अभिनव सामाजिक संस्थेने काढली महापुरुषांच्या विचारांची दिंडी

July 26, 2026

पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीचे निकष स्पष्ट; इंग्रजी माध्यमातील उमेदवारांना मोठा दिलासा

July 26, 2026

आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी १५० कोटी

July 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1002332

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!