दिनांक 10 आॕगष्ट 2023 रोजी किर्लोस्कर वसुंधरा फेस्टिवल व कै. वि.मो. मेहता माध्यमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने भरडधान्य व महाराष्ट्र सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात सोलापुरातील शाळांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत आपल्या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम क्रमांक कु. तनिष्का कुंभारे, कु. नईशा साबळे, कु. प्रणिती म्हेञे यांनी तर द्वितीय क्रमांक चि.अथर्व केदार, चि. कौशिक क्षीरसागर, चि. मयंक बोंदार्डे यांनी यश संपादन केले.
या स्पर्धेसाठी किर्लोस्कर समूहाचे अधिकारीवर्ग, प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. श्रुती बागेवाडी, पर्यवेक्षिका मा. सौ. सुस्मिता तडकासे उपस्थित होते.