चालू वर्षी पाऊस नसल्याने दुष्काळजन्य परिस्थिती असूनही, मोहोळ तालुक्यात गणेश आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. चालू वर्षी पोलिसांच्या प्रबोधनामुळे 46 ठिकाणी “एक गाव एक गणपती” ही संकल्पना राबवली आहे. तालुक्यात एकूण 191 ठिकाणी गणेशाची प्रतिष्ठापना होणार आहे. गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी 138 जणावर विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.
ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील गणेश मंडळे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहेत. शहरातील “वन मॅन शो” गणेश मंडळाने सतत आठ दिवस महिलासाठी व्याख्यानांचे आयोजन केले आहे. त्यात नामवंत वक्ते बोलावून महिलांच्या आरोग्या विषयी, आर्थिक सक्षमीकरण, नोकरी विषयक च्या संधी यासाठी प्रबोधन करण्यात येणार आहे. तर लकी ड्रॉ च्या माध्यमातून सतत आठ दिवस सोने-चांदी पैठणी यासह अन्य बक्षिसांचे नियोजन केले आहे.