लातूर दि.25 जानेवारी- लातूर जिल्ह्यातच नव्हे तर शेजारील जिल्ह्यांतही सुप्रसिद्ध असलेल्या येथील गांधी चौकातील वारद मेडिकलला 25 जानेवारीला रात्री 1 वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत मेडिकल दुकान जळून खाक झाले. या आगीने दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. सब मरिजोंकी दवा एकही दुकान मे, वारद मेडिकल दुकानात अमुक औषध मिळाले नाही, असे कधीच झाले नाही. सर्वप्रकारची औषधे उपलब्ध करून देणारे औषधी दुकान म्हणून वारद मेडिकल परिचित आहे. 25 जानेवारी रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास या दुकानास आग लागली. त्यात दुकानातील औषधे जळून खाक होऊन मोठे नुकसान झाले. आग लागल्याची माहिती मिळताच लातूर शहर महानगरपालिका अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी आगीवर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने दुकानाचा वरचा मजला आगीपासून वाचविण्यात आल्याचे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख सुभाष कदम यांनी सांगितले. शॉर्टसर्किटने ही आग लागली असावी, असा अंदाजही कदम यांनी व्यक्त केला आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...