वसमत: उपजिल्हा असलेल्या वसमत शहरात ग्रामीण भागातून नागरीक खरेदी करण्यासाठी व आरोग्य विषयी औषध उपचार घेण्यासाठी वसमत शहरात नेहमीच ग्रामीण भागातील नागरिकांची वर्दळ असते तर विशेष म्हणजे ग्रामीण भागातून येणारे नागरिक हे दुचाकी वर शहरात येतात औषध किंवा कुठलयाही दुकानात खरेदी करण्यासाठी गेले असता गाडी दुकानासमोर लावतात सदरील दुकानाचे वस्तू खरेदीचे बिल देईपर्यंत पोलिसांची गाडी ही वाहने उचलून नेतात व त्यासाठी गोरगरीब जनतेच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे.
विशेष म्हणजे अवजड वाहनांना पोलिसांनी सूट दिली आहे? विशेष म्हणजे याच अवजड वाहनामुळ वाहतुकीचा खोळंबा होतोय. शहरातील मध्यभागी असलेले झेंडा चौक येथे बिनधास्तपणे दारूचे अवजड वाहने रिकामे होत आहेत यावर कुठलीच कारवाई पोलीस करताना निदर्शनास येत नाही तर चार चाकी वाहनावर देखील कारवाई होत नाही या पाठीमागचे गोड बंगाल काय? यामुळे अवजड वाहनावाल्यांना सूट दुचाकी वाल्यांची लूट अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
शहरांमध्ये अवजड वाहनांचा प्रवेश दिवसा बंद करावा अशी मागणी वसमत शहरवासीयाकडून करण्यात येत आहे टू व्हीलर वाल्यांची धरपकड मोहीम मुळे शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कारण गाडी उचलून नेणारे हे धावपळ करत असल्याने व गोंधळ निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही विशेष म्हणजे नो पार्किंग चे बोड हे निदर्शनासच येत नसल्याने यामुळे दुचाकी वाल्यांमध्ये गाडी कुठे लावावी हा प्रश्न निर्माण होत आहे.
सदरील प्रकरणाकडे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक यांनी लक्ष वेधून यामध्ये मार्ग काढावा अशी मागणी जोर धरत आहे. शहरातील मध्यवर्ती बस स्थानकास ज्येष्ठ नागरिक, महिला, व मुली यांना बस स्थानक येथे सोडण्याकरता येणारे व्यक्तीची वाहने देखील हे पोलिसा कडून गाडी उचलून नेत आहे.
बस स्थानक परिसरामध्ये पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे प्रवाशांनी त्यांची टू व्हीलर कोठे लावावी बस स्थानकातील कर्मचारी व प्रवाशांना सोडण्याकरता येणाऱ्यांची वाहने हे पोलीस घेऊन जातात ते कितपत योग्यआहे याचाच विचार वरिष्ठांनी करावा किंवा बस स्थानकातील अधिकारी यांनी पार्किंगची व्यवस्था करावी अशी मागणी देखील जोर धरत आहे.