आकाशवाणी केंद्राच्या पुढे असणाऱ्या नवीन घरकुल रोडवरील विजयनगर इथल्या ईराबती कारखान्याला मंगळवारी रात्री 7:30 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली आहे. आगीचे लोट वीजवण्यासाठी सोलापूर महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या वतीने शर्थीचे प्रयत्न करत असून शहरातील विविध अग्निशामक केंद्रातून पाण्याचे बंब घटनास्थळी मागवल्याचे सांगण्यात आले. दरम्यान घटनेचा तपास सुरू असून नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. सर्वत्र अंधार असल्यामुळे तसेच मोठ्या प्रमाणात आग लागल्याने सदरच्या आगीचे चित्र भयंकर दिसत आहे
Post Views: 177