बारामतीच्या मोरगाव मधील एका खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांना, सहलीसाठी घेऊन घेलेल्या बसचे ब्रेक अचानक निकामी झाले. बसचे ब्रेक निकामी झाल्याचं लक्षात येताच बस चालकाने रस्त्यावरच्या नागरिकांना सावध करत, चालत्या बसमधून उडी मारून चाकाखाली दगडं टाकून बस थांबवली. चालकाने दाखवलेल्या ह्या प्रसंगावधानामुळं मोठा अनर्थ टळला आहे. बस वरंधघाट मार्गे रायगड किल्ल्यावर विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन जात असताना पुण्याच्या भोरमधील चौपाटी परिसरात ही घटना घडली. बसमध्ये एकूण ३४ विद्यार्थी होते.
स्थानिकांनी दिलेली माहितीनुसार, मोरगावमधील एका खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन निघालेल्या बसचे ब्रेक अचानक निकामी झाले. बसचे ब्रेक निकामी झाल्याचं लक्षात येताच चालकाने रस्त्यावरच्या नागरिकांना सावध करत चालत्या बस मधून उडी मारून चाकाखाली दगडं टाकून बस थांबवली. चालकाने दाखवलेल्या ह्या प्रसंगावधानामुळं मोठा अनर्थ टळला. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
पुणे : विद्यार्थ्यांच्या बसचा ब्रेक अचानक फेल, धावत्या बसमधून चालकाने उडी मारली अन्…; पुण्यातील धडकी भरवणारा VIDEO pic.twitter.com/wU4OkxwkL5
— Maharashtra Times (@mataonline) February 5, 2023