तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथील चंद्रकांत नरळे या शेतकऱ्याने आपल्या शेतात तीन एकरावर कांद्याचे पीक घेतले आहे. तीन महिन्यात एक ते सव्वालाख रुपये खर्च करत पोटच्या पोराप्रमाणे कांद्याचे पीक जोमदार वाढवले. कांद्याचे भाव कोसळले आहेत. उत्पादन खर्च तर दूरच शेतातून कांदा काढणी मजुरी आणि वाहतूक खर्च ही निघणार नसल्याने हवालदिल झालेल्या नरळे यांनी नैराश्यापोटी आपल्या तीन एकर क्षेत्रात काढणीला आलेल्या जोमदार कांदा पिकावर ट्रॅक्टरद्वारे रोटर फिरवला आहे. केंद्र व राज्य सरकारने इतर प्रश्नापेक्षा शेतकर्यांकडे लक्ष दिल्यास शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार नसल्याचे चंद्रकांत नरळे यांनी सांगितले.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...