पेहे ता.पंढरपूर येथील माध्यमिक विद्यालयाची कु.राधा जगन्नाथ आवटे वय १६ वर्षे ही विद्यार्थिनी गुरुवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२३ रोजी इयत्ता दहावीचा पेपर संपल्यानंतर ढेकळेवाडी येथील नातेवाईकांकडे भाऊ संदीप यांच्याबरोबर जात असताना बार्डी रस्त्यावरील एम.एस.ई.बी.कार्यालयाजवळ रस्त्याच्या बाजूचे पेटलेले झाड अंगावर पडल्याने राधा हिच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी करकंब ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला या दुःखद घटनेने पेहे व बादलकोट परिसरात शोककळा पसरली आहे.
तर दुसऱ्या दुर्दैवी अपघातामध्ये यशवंत विद्यालय भोसे ता.पंढरपूर येथे इयत्ता सातवीमधील अक्षरा देविदास जमदाडे वय १४ वर्षे ही विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर भोसेपाटी येथे आल्यानंतर पिकपचा दरवाजा अचानक उघडला गेल्याने त्याचा धक्का लागून सदर विद्यार्थिनी बाजूला जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली पडल्याने तिचा मृत्यू झाला.या दुर्दैवी घटनेने भोसे परिसरामध्ये शोककळा पसरली आहे.
पुढील तपास करकंब पोलिस स्टेशनचे स.पो.नि.निलेश तारु यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.मयूर गव्हाणे व अभिजित कांबळे हे करीत आहेत.