मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी एका टोळीला माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली आहे. असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. हा आरोप म्हणजे बालिश बहु बायकांत बडबडला असाच असून हा केवळ राजकीय दोषापोटी केलेला स्टंट असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे परळी तालुकाप्रमुख शिवाजी शिंदे, शहरप्रमुख वैजनाथ माने यांनी दिली आहे.
दि. 23 फेब्रुवारी 2023 रोजी शिवसेनेचे बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे परळी तालुकाप्रमुख शिवाजी शिंदे, शहर प्रमुख वैजनाथ माने यांच्या नेतृत्वाखाली परळी येथील राणी लक्ष्मीबाई टावर येथे संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी “धिक्कार असो धिक्कार असो संजय राऊत यांचा अधिकार असो”,” संजय राऊत यांच करायचं काय खाली मुंडकं वर पाय” अशा घोषणा दिल्या.
त्यानंतर संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडे मारून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी शिंदे, शहर प्रमुख वैजनाथ माने, उपतालुका प्रमुख सोमेश्वर गिते, उपशहर प्रमुख अॅङ संजय डिगोळे, बाळासाहेब खोसे, युवा सेनेचे शहर प्रमुख गजानन कोकीळ, सय्यद निसार, विठल गायकवाड, सचिन सोनवणे आधी सह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.