द्वारका एक्स्प्रेस-व संदर्भातील सीएजीच्या रिपोर्टमध्ये घोटाळा झाल्याची टिप्पणी करण्यात आलीय. गेल्या 10 ऑगस्ट रोजी हा रिपोर्ट संसदेच्या पटलावर ठेवण्यात आला. यासंदर्भातील सीएजीचा अहवाल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी फेटाळला आहे. तसेच एद्वारका एक्स्प्रेस-वेमध्ये 12 टक्के पैशांची बचत झाल्याचा दावा गडकरींनी केलाय.
सीएजीच्या रिपोर्टवर चर्चा होत असतानाच सर्व आरोप फेटाळून लावताना गडकरी म्हणाले की, सीएजीच्या रिपोर्टमध्ये सांगितलेले मुद्दे योग्य नाहीत. द्वारका एस्क्प्रेसवे 29 किलोमीटर अंतराचा असल्याचे सांगण्यात आलेय. आम्ही जो कॅबिनेट नोट पाठवली होती त्यात लिहिले होते की आम्ही 5 हजार किलोमीटरचा टू लेन रोड बनवू आणि त्याची किंमत 91 हजार कोटी रुपये असेल. यात फ्लायओव्हर आणि रिंगरोडची किंमत इस्टिमेटेड डीपीआर बनल्यानंतर ठरवण्याचा निर्णय झाला होता, अशी माहिती गडकरी यांनी दिली. मुद्दा असा आहे की कॅग ज्याला 29 किलोमीटर म्हणत आहे, तो 230 किलोमीटरचा एस्क्प्रेसवे आहे. यात 6 टनेल आणि 563 किलोमीटर एकूण लेनचा रोड आहे. जो टेंडर निघाला होता तो 206 कोटी रुपये प्रति किलोमीटर साठी होता. त्यामुळे आम्ही या प्रोजेक्टवर 12 टक्के कमी खर्च केल्याचे गडकरींनी सांगितले.
गडकरी म्हणाले की, आमच्या अधिकाऱ्यांनी हा मुद्दा सीएजी समोर ठेवला होता. चर्चेमध्ये सीएजीच्या अधिकाऱ्यांनी ही गोष्ट मान्य केली होती. पण, आमच्याकडून चूक झाली की आम्ही ही गोष्ट त्यांना लिखित स्वरूपात दिली नाही. आम्ही टाईम बाऊंड आहोत, रिझल्ट ओरिएंटेड आहोत आणि भ्रष्टाचार मुक्त आहोत. या सरकारमध्ये मी 50 लाख कोटींचे कामे केली आहेत. एकाही कामामध्ये कोणताही कत्रांटदार किंवा अन्य कोणी म्हणत असेल की एक रुपयाही द्यावा लागला असेल तर सांगाल ती शिक्षा भोगायला तयार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.