तहसीलदार संजय खडतरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तीन महिन्यातच तब्बल २८ कोटी २० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तहसीलदार खडतरे यांनी या तीन महिन्यात शासकीय परवाना न घेता आणि रॉयल्टीची रक्कम बुडवून अवैध गौण खनिज उपसा केल्याप्रकरणी १९ जणांवर कारवाई करून दंडाची नोटीस बजावली. कोपटेवस्ती येथील पप्पू इंगोले व इतर चौघांवर अवैधरीत्या पाच हजार ब्रास वाळू उत्खनन केल्याप्रकरणी १७ लाख ८० हजार ५५० रुपयांचा दंड ठोठावला. वासूद येथील दीपक केदार व सचिन केदार यांनी अवैधरीत्या ९०० ब्रास वाळू उत्खनन केल्याप्रकरणी ३ कोटी २० लाख ४० हजार ५५० रुपयांचा दंड ठोठावला.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...