टोमॅटोच्या वाढत्या भावामुळे चर्चेत आलेला टोमॅटो मैल्यवान वस्तू झाली आहे. पडसाळी (ता.उ. सोलापूर) येथील एका शेतातील दोन लाख ७० हजार किमतीच्या टोमॅटोची चोरी करून चोरट्याने पोबारा केला.अंदाजे ८० ते ९० कॅरेट टोमॅटोची चोरी झाली आहे.
शेतकरी बालाजी गजेंद्र भोसले व धनाजी गजेंद्र भोसले या दोघांचा भावांचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून आहे. अगोदरच कर्जामुळे या कुटुंबास जमीन ही विकावी लागली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. भोसले कुटुंबीयांनी आपल्या शेतातील सव्वा एकर प्लॉटमध्ये टोमॅटो लागवड केली होती. सध्या टोमॅटोला चांगला दर असून, प्रति कॅरेटला तीन हजार रुपये प्रमाणे विकला जात आहे. अंदाजे ८० ते ९० कॅरेट टोमॅटोची चोरी झाली.