लापूर शहरात अडीच लाख मिळकतदार असून त्यातून महापालिकेला यंदा साधारणतः ३०८ कोटींचा टॅक्स अपेक्षित आहे. पण, आतापर्यंत केवळ ७१ कोटींचीच वसुली झाली आहे. मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन आता १ सप्टेंबरपासून दोन वर्षांत टॅक्स न भरलेल्या मिळकतदारांवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. त्यादृष्टिने महापालिकेच्या करसंकलन विभागाचे नियोजन सुरु आहे.
मिळकतदारांनी ३१ ऑगस्टपर्यंत त्यांच्या मालमत्तेचा टॅक्स ऑफलाईन भरल्यास पाच टक्के तर ऑनलाइन भरल्यास सहा टक्के सवलत दिली जात आहे. पण, मुदतीत टॅक्स न भरल्यास त्या मिळकतदाराला एकूण टॅक्सच्या रकमेवर दरमहा २ टक्के दंड भरावा लागणार आहे. तसेच त्या मालमत्तेवर बोजा चढविण्याची किंवा जप्तीची कारवाई केली जाणार आहे.