सोलापूर येथे एका इसमाने किट नाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग लगतच्या एका फॅक्टरी जवळ हा प्रकार घडली. नितीन भास्कर आतकरे (46) रा. देगाव (वाळूज) ता. मोहोळ असे मृताचे नाव आहे.
नितेश आतकरे व इतर नातेवाईक घटना स्थळावर गेले असता त्या ठिकाणी नितीन हा पाण्याची बाटली उशाला घेऊन त्याचे नाका तोंडातून पांढऱ्या रंगाचा फेस आल्याचे दिसले. नितीन ज्या ठिकाणी पडला होता त्या नळी लगतच पिकावर फवारणी करण्याच्या औषधाची अर्धवट भरलेली बाटली आढळून आली. त्यामुळे नितीन याने औषध प्राशन केल्याची खात्री झाली.