घटस्फोट देण्याच्या कारणावरून आठ दहा जणांनी मिळून लोखंडी रॉड आणि काठीने मारहाण केली आहे. यामारहाणीत 27 वर्षे तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. नितीन अनिल पतंगराव वय 27 वर्ष रा. हुचेश्वर नगर सोलापूर असे मयत झालेल्या विवाहित तरुणाचे नाव आहे. दिनांक 04 फेब्रुवारी 2023 रोजी कामावरुन राहते घरी येत असताना मुलीला घटस्फोट देण्याच्या कारणावरून महेश श्रीपती शेजेराव, हर्षवर्धन महेश शेजेराव व इतर 8 ते 10 जणांनी मिळून लोखंडी रॉड व काठीने केलेल्या मारहाणीत त्यास डोक्यास जखम व खंद्यास मार लागल्याने सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
त्यांना पुढील उपचारासाठी मार्कंडेय रुग्णालय येथे दाखल केले होते. येथून पुन्हा पुढील उपचाराकरिता सोलापूर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे झाली आहे. नितिन पतंगराव यांच्या मृत्यूची बातमी नातेवाईकांना मिळताच शासकिय रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केल्याचे दिसून आले यावेळी मयताचे भाऊ आणि काका यांनी या घटनेबाबत अधिक माहिती दिली आहे.