पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत, सोलापूरमधील हा प्रकल्प 100 एकरांमध्ये पसरलेला असून त्यात 30 हजार घरे आहेत, त्यापैकी 15 हजार घरे आधीच बांधली गेली आहेत.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्वात मोठी गृहनिर्माण योजना आता अंतिम टप्प्यात आहे. त्याचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी येणार आहेत. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) हा प्रकल्प राबवत आहे, ज्याला केंद्र सरकारच्या PMAY चे सहाय्य देखील आहे.असंघटित कामगार, कापड कामगार, विडी कामगार, बांधकाम कामगार, कचरा वेचक आणि वस्त्र कामगार यांचा समावेश असलेल्या लाभार्थ्यांना ही घरे मिळणार आहेत. यातील प्रत्येक घर 300 चौरस फुटांमध्ये बांधलेले आहे आणि 3 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या पात्र लाभार्थ्यांना ही घरे देण्यात येणार आहेत.सोलापुरमध्ये देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत होत आहे. सोलापुरमधील कुंभारी गावात या वसाहतीच्या पहिल्या टप्प्यातील 15 हजार घरांचे लोकार्पण होणार आहे. 9 जानेवारी 2019 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाचे उदघाटन केले होते.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...