गेल्या पाच वर्षांपासून मंगळवेढा, सांगोला तालुक्यातील चारा छावणीचालकांची कोट्यवधी रुपयांची बिले शासनाकडून रखडली आहेत. अडचणीत सापडलेल्या छावणी चालकांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिका-यांकडे सातत्याने पाठपुरावा करूनही बिलासाठी अनुदान मिळत नाही.अनुदान उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील छावणी चालकांनी सांगोला तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.या आंदोलनास दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील व व्हा चेअरमन तानाजी खरात यांनी भेट दिली.
मंगळवेढा व सांगोला तालुक्यात जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी शासनाने चारा छावण्यांना मंजुरी दिली होती. त्यानुसार काहींनी स्वत: छावण्या चालवल्या तर बहुतांश जणांनी भागीदारीत छावण्या चालवल्या होत्या. वेळेवर बिले निघतील म्हणून तुटपुंज्या भांडवलावर अनेकांनी छावण्या चालवायला घेतल्या. बिले थकल्यामुळे आता छावणी चालकांची कसरत सुरू आहे.