माननीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी सोलापूरला पहिल्यांदा आले तेव्हा 2014 सोलापूरची विशेषता त्यांनी सांगितले क्षमता चादर टावेल ची क्षमता त्यांनी पडताळून बघितले त्यांच्याकडून आम्ही सुरुवात केली असे मत सोलापूरचे माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.
हॉटेल सरोवर येथे श्री सोलापूर रेडीमेड कापड उत्पादक संघ आयोजित सहावा फॅशन गारमेंट मॅन्युफॅक्चर प्रदर्शनाचे उद्घाटनानिमित्त ते बोलत होते. यावेळी संतोश कोलते, सचिन जाधव स्किल डेवलोप चे अध्यक्ष राजूभाई शाह उपाध्यक्ष सतीश पवार फेअर चेअरमन शैलेंद्र घनाते सचिव श्रीनिवास माळगे आदी उपस्थित होते.
फेअर दोन तीन चार ऑगस्टपर्यंत चालणार असून या फेअर मध्ये एकूण 65 स्टॉल उभारले असून यात सर्वच प्रकारच्या फॅशन कपड्यांचा समावेश आहे जसे युनिफॉर्म, बॉईज वेअर, फॅन्सी ट्राउझर, शर्ट, लेडीज गाऊन , टॉप, ब्रा आणि पँटीज, अँड लहान मुलींचे फ्रॉक अशा उत्पादकांचा समावेश आहे. आज पहिल्याच दिवशी फेरला साडेचारशे रिटेल व्यापाऱ्यांनी भेट दिली.
एकूण सात हजार व्यापाऱ्यांना निमंत्रण दिले असल्याचे असोशियन कडून सांगण्यात आले.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...