सोलापूर – मध्यरेल्वेचे महाप्रबंधक नरेश लालवाणी हे सोलापूच्या दौऱ्यावर होते. मध्यरेल्वेचे नरेशजी लालवाणी व खासदार डॉ जय सिध्देश्व़र शिवाचार्य महास्वामी यांच्या समवेत अलिकडेच मिटींग घेण्यात आली होती. त्यावेळी सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजु राठी वंदेभारत सुपरफास्ट़ एक्सप्रेससाठी त्याचे आभार व्यक्त़ केले व त्यांचा सत्कार केला.
चेंबरचे अध्यक्ष राजु राठी यांनी सोलापूरला टर्मीनल बनवावे अशी मागणी केली. कारण सोलापूर रेल्वे स्टेशनला टर्मीनल बनवावे, सोलापूरच्या आजुबाजूस तीर्थक्षेत्र जसे पंढरपूर, गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर, सोलापूर चे सिध्दरामेश्व़र मंदीर आहे व नागरिकांचे येणे-जाणे चालू असते. सोलापूर स्टेशन वरून गाडी सुटेल व शेवटचे स्थानक सुध्दा सोलापूरच राहिल व स्टेशनच्या दोन्ही बाजून रहदारी चालू राहील त्यामुळे वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी सोलापूर रेल्वे स्टेशनचे “सोलापूर टर्मिनल’ करणे आवश्यक आहे.
सोलापूरला टर्मीनल बनवल्यामुळे ट्राफीकच्या समस्या सुटतील व टर्मीनल मुळेजी सुवीधा मिळेल त्याचा लाभ यात्रेकरुना व नागरिकांना होईल. लॉकडाऊनच्या काळापासून जेष्ठ़ नागरिकांना तिकीट दरामध्येजी सवलत मिळत होती ती सध्या बंद झाली आहे ती पुन्हा सुरु करावी या साठी मागणी केली. व सोलापूर – सिकंद्राबाद – सोलापूर इंटरसिटी ची मागणी ही केली जी पूर्वी पासून मागणी सुरु आहे.
या गाडी मुळे सामान्य़ नागरिकांची, व्यापारी वर्गची उद्योजक व भाविकांची खुप सुविधा होईल ती चालु करण्याचा सकारात्म़ विचार करावा अशी मागणी केली. व वंदेभारत सेमी सुपरफास्ट एक्स्प्रेसचे मुंबई ते सोलापूर वेळेत बदल करावी सायंकाळी 6 वाजेनंतर सोडावी त्यांना अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले.
या वेळी खासदार डॉ जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी,डि.आर.एम निरज डोहारे, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजु राठी, संचालक सुकुमार चंकेश्वरा, शैलेश बच्चुवार, व रेल्वे चे उच्च पदस्थ अधिकारी आदी उपस्थित होते.