करमाळा पंचायत रोजगार हमीच्या कामाचा विषय आता चव्हाट्यावर आला आहे.रोजगार हमी योजनेतुन मंजुर झालेली विहीर नदीच्याकडेला शेतकरी स्वतःच्याच शेतात विहीर खोदता येत नाही असे तांत्रिक अधिकारी विवेकानंद फाळके सांगत असून संबंधित शेतकऱ्यांला शासकीय लाभापासून वंचित ठेवत असल्याची तक्रार संबंधित शेतक-याने केली आहे.
विशेष म्हणजे नदीच्या कडेला स्वतःच्या शेतात रोजगार हमीची विहीर घेता येणार नाही असा उल्लेख शासकीय आदेशात कोठेही नसताना जाणीवपूर्वक संबंधित शेतकऱ्याला शासकीय लाभापासून वंचित ठेवले जात आहे. रोजगार हमीच्या विहिरी करण्यासाठी आणि मस्टर भरून बिल काढण्यासाठी तांत्रिक अधिकारी विवेकानंद फाळके हे शेतकऱ्यांना नको ते नियम दाखवून पैसे काढत आहेत. एका विहिरीसाठी शेतकऱ्यांकडून 25 ते 30 हजार रुपये घेतल्याशिवाय त्यांचे मस्टर भरले जात नाहीत. याबाबत गेली अनेक दिवसांपासून तालुक्यात उघड चर्चा सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्याला नेमके कोण पाठीशी घालत आहे. संबंधित अधिकाऱ्याचे एवढे धाडस कसे होत आहे. याबाबत चौकशी करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे.