सोलापूर शहरातील शास्त्री नगर परिसरात घरगुती गॅस सिलेंडर देण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयची चांगलीच फजिती झाली आहे.गॅस सिलेंडर घेताना नागरिकांनी डिलिव्हरी बॉयच्या समोरच वजन करून दाखवले.प्रत्येक टाकीत दोन किलो गॅस कमी असल्याचे निदर्शनास आले.संतप्त झालेल्या नागरिकांनी ताबडतोब एलपीजी गॅस सिलेंडरने भरलेले वाहन सदर बाजार पोलीस ठाण्यात आणून लावले.
पोलिसांकडे रीतसर तक्रार मांडली.सदर बाजार पोलीस ठाण्यातील पोलिसांनी नागरिकांची तक्रार ऐकून घेतली.पोलिसांनी निरीक्षक वैध मापन शास्त्र अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलावून प्रत्येक घरगुती गॅस सिलेंडरची ऑन कॅमेरा तपासणी केली.11 टाक्यांमधून 3 सिलेंडर टाक्यांत दोन दोन किलो एलपीजी गॅस कमी भरले असल्याचे समोर आले.
विशेष म्हणजे हे एलपीजी गॅस सिलेंडर सील होते.सोलापुरात एलपीजी गॅस सिलेंडरच्या वजनात गोलमाल करणारा आणि कोट्यावधी रुपयांची माया गोळा करणारा मोठा रॅकेट असण्याची शक्यता या घटनेमुळे वर्तवल जात आहे. दरम्यान शास्त्री नगर,मौलाली चौक,सिद्धार्थ सोसायटी,लष्कर,उत्तर सदर बाजार आदी भागात गोरगरीब नागरिकांची वसाहत आहे.झोपडपट्टी भाग म्हणून देखील या परिसरास ओळखले जाते.शनिवारी दुपारी या परिसरात राहणाऱ्या एका सजग नागरिकास संशय आला.सील असलेल्या घरगुती गॅस सिलेंडरच्या टाक्यांच्या वजनात काही तरी गोलमाल आहे.
डिलिव्हरी बॉयला थांबवून त्यांच्या समक्ष सील असलेल्या गॅस सिलेंडरच्या टाक्या वजन काट्यावर आणत वजन तपासले.सर्व नागरिकांसमोर एलपीजी सिलेंडर दोन दोन किलो कमी भरल्याचे लक्षात आले.विशेष म्हणजे यासिलेंडर टाक्या सील होत्या.संतप्त झालेल्या नागरिकांनी डिलिव्हरी बॉय आणि त्याच्या वाहनाला एलपीजी सिलेंडर टाक्यासह सदर बाजार पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या हवाली केल्याचे दिसून आले.