सोलापूर: तब्बल बारा वर्षानंतर महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे तत्कालीन प्रशासन अधिकारी सत्यवान सोनवणे व दक्षिण पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी अदिलशहा शेख यांच्या चौकशीवर काय कारवाई झाली असा सवाल शासनाने झेडपीच्या प्राथमिक शिक्षण विभागाला विचारला आहे.
सन 2012 मध्ये दक्षिण पंचायत समितीकडे गटशिक्षणाधिकारी म्हणून अदिलशहा शेख कार्यरत होते. या काळात त्यांच्याविरूद्ध तक्रारी झाल्या होत्या. यावरून विभागीय चौकशी करण्यात आली होती. तसेच महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाकडे प्रशासन अधिकारी म्हणून सन 2008 मध्ये सोनवणे कार्यरत होते. या काळात वेतनासंदर्भात त्यांच्याविरूद्ध तक्रारी होत्या. याची विभागीय चौकशी करून अहवाल सादर केला गेल्याचे सांगण्यात येत आहे. या तक्रारीवरून या दोघांवर शिक्षण विभागाने काय कारवाई केली याचा खुलासा शासनाने मागितला आहे. 12 व 7 वर्षाचे जुने प्रकरण असल्याने नेमके यात काय घडले आहे याचे उत्तर शिक्षण विभागातील कर्मचार्यांना सापडेनासे झाले आहे.
प्रभारी प्राथमिक शिक्षण अधिकारी संजय जावीर यांना मंगळवारी हे पत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी तत्कालीन अधीक्षक मुतवल्ली, वरीष्ठ लिपिक गाडेकर यांच्याकडे या प्रकरणाविषयी चौकशी केली. त्यानंतर प्रशासन विभागाला शेख यांच्याविरूद्ध झालेल्या तक्रारीची फाईल शोधण्यास सांगितले आहे. सोनवणे यांचे प्रकरण मनपा शिक्षण मंडळाकडे असल्याने त्यांच्याकडून ही माहिती मागविण्यात येणार असल्याचे जावीर यांनी सांगितले.
शेख झाले निवृत्त
गटशिक्षणाधिकारी अदिलशहा शेख हे निवृत्त झाल्याचे प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकार्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध तक्रारी काय होत्या व कारवाई काय केली याबाबत काय उत्तर द्यावे हे अधिकार्यांना सुचेनासे झाले आहे. चौकशी केल्यावर शेख हे सेवानिवृत्त झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे शिक्षण विभागाची आणखीन पंचाईत झाली आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...