Wednesday, July 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भावनिक राजकारण न करताना धर्मराज काडादी यांनी मैदानात यावे – विजयकुमार देशमुख

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 4, 2023
in solapur
0
भावनिक राजकारण न करताना धर्मराज काडादी यांनी मैदानात यावे – विजयकुमार देशमुख
0
SHARES
29
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तभा वृत्तसेवा
सोलापूर दि. 3 जानेवारी-
सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची को जनरेशनची चिमणी धर्मराज काडादी यांनी बेकायदेशीरपणे उभी केली. राज्यात भाजपची सत्ता असताना पाडकामाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली. आता काडादी मोठ मोठ्या नेत्यांची नावे घेत आहेत. सहा महिन्यापूर्वी राज्यात कोणाची सत्ता होती. अडीच वर्षात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व रोहित पवार यांनी तुम्हाला चिमणीसाठी का मदत केली नाही असा सवाल आमदार विजयकुमार देशमुख यांनी उपस्थित करून काडादी यांना भावनिक राजकारण न करता थेट मैदानात या असे खुले आव्हान दिले आहे.
बोरामणी विमानतळ सुरू करण्यात यावे या मागणीसाठी धर्मराज काडादी यांच्या नेतृत्वाखाली सिद्धेश्‍वर कारखान्याचे शेतकरी सभासद, कर्मचारी व हितचिंतकांनी मोर्चा काढला होता. या मोर्चासमोर भाषण करताना काडादी यांनी आमदार देशमुख यांचे नाव न घेता आरोप केले होते. यावेळी हिवाळी अधीवेशन सुरू असल्याने आमदार देशमुख सोलापुरात नव्हते. अधिवेशन संपल्यानंतर ते सोलापुरात आले आहेत. त्यांनी पत्रकारांशी बोलताना काडादी यांच्या आरोपांना उत्तरे देत थेट मैदानात येण्याचे आव्हान दिले आहे.
आमदार देशमुख म्हणाले, समाजाचे आधार घेउन राजकारण करण्यापेक्षा तुम्ही मैदानातच या. मग तुमची विश्‍वासार्था पाहू. तुम्हाला आमदार नको असेल, खासदार नको असेल तर तुम्ही लोकांमध्ये या. लोकांमध्ये तुमची विश्‍वासार्हता किती आम्ही बघूच. मला निवडून देणारे काडादी किंवा रोहित पवार नाहीत. सोलापुरातील सुजाण नागरिक निवडून देणारे आहेत. सिद्धेश्‍वर कारखान्याची चिमणी उभी करताना महापालिकेत कोणाची सत्ता होती. तुम्ही कागदपत्रे काढून बघा. चिमणी उभी करताना काडादी यांनी मनपा, पर्यावरण विभाग, विमानतळ प्राधिकरणाची परवानगी घेतली नाही. साधं घर बांधताना कितीतरी कागदपत्रे द्यावी लागतात. पण कारखान्याची चिमणी बेकायदा बांधली गेली. युतीचे सरकार असताना चिमणी पाडकामाचे न्यायालयाकडून आदेश आले. महापालिकेने चिमणी पाडकामाची तयारी केली होती. त्यावेळी कारखान्याचे काही संचालक, माजी मंत्री दिलीप सोपल व माझ्या पुढाकाराने बैठक लावण्यात आली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिमणी पाडकामाला स्टे दिला. यापुढील काळात कारखान्याने चिमणी कायदेशीर करण्याचे सोपस्कार करणे आवश्यक होते.
चिमणी विरोधात कोण गेले
चिमणीविरोधात कोर्टात कोण गेले. भाजपने कि भाजपच्या कार्यकर्त्याने चिमणी विरोधात तक्रार केली आहे का? एकतर बेकायदा चिमणी उभी केली. ती कायदेशीर करून घेण्याची जबाबदारी कोणाची. आपली चूक झाकण्यासाठी काडादी उगाच भाजपला टार्गेट करीत आहेत. तुम्ही मोठमोठ्या नेत्यांची नावे घेता मग त्यांनी तुम्हाला का मदत केली नाही असा सवाल आमदार देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
देवस्थानशी माझा नाही संबंध
देवस्थानचा माझा संबंध नाही. मी काही पंच नाही. मला माहित नाही काडादी असे का बोलले. स्वत: केलेल्या चुकांना दुसर्‍यांवर घालण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तुम्ही लोकांसमोर जा, चूक कबूल करा. दुसर्‍यांवर चूक ढकलून यांनी मदत केली नाही असा कांगावा करू नये. चिमणीच्याबाबतीत कायदेशीर बाबी काडादींनीच निस्ताराव्यात. गेल्या अडीच वर्षात आमची (भाजपाची) सत्ता नव्हती. तुम्ही मोठ्या लोकांची नावे घेता. मग या मोठ्या लोकांनी का परमीशन काढून दिली नाही असेही आमदार देशमुख यांनी सुनावले.
ते पुन्हा आमदार झाले का
आमदार रोहित पवार यांनी सोलापुरातील आमदार खासदार बदलावेत असे भाष्य केले, याकडे लक्ष वेधल्यावर आमदार देशमुख म्हणाले, विकास कामावर आम्ही चारवेळा निवडून आलो आहे. ज्यांनी माझ्यावर तोंडसुख घेतले ते पुन्हा आमदार झाले का याचे त्यांनी आत्मचिंतन करावे. माझ्यावर जनतेचा पूर्ण विश्‍वास आहे. बेकायदेशीर कामाला आम्ही काय मदत करावी हे काडादी यांनीच सांगावे. उठसूट भाजपच्या आमदार, खासदारावर आरोप करण्यापेक्षा तुम्ही स्पष्टपणे राजकारण करा. कुठला तरी भावनिक मुद्दा करत अथवा समाजाचा आधार घेउन राजकारण करण्यापेक्षा तुम्ही मैदानातच या मग तुमची विश्‍वासार्हता पाहू, असे आव्हान आमदार देशमुख यांनी काडादी यांना दिले आहे.
भाजप असं करीत नाही
काडादी यांनी समाजाची मागणी रेटून मंत्रीपद द्यायला लावलं असं जाहीरपणे सांगितले आहे, त्यावर तुमचं म्हणणं काय असे विचारले असता आमदार देशमुख म्हणाले, भाजप असं कोणाच्या शिफारशीवर मंत्रीपद देत नाही. मंत्रीपद मिळालं तरी मी कोणाच्या विरोधात काम केलेले नाही. आपल्या चुका झाकण्यासाठी काडादी असं काहीही बोलून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण लोकांना सगळं माहित आहे.

Post Views: 153
Previous Post

सोलापूर:- शिक्षण विभागात धावपळ: फायली सापडत नसल्याने अधिकार्‍यांची पंचाईत

Next Post

साथरोग सर्वेक्षणात लातूर जिल्हा राज्यात प्रथम…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
साथरोग सर्वेक्षणात लातूर जिल्हा राज्यात प्रथम…

साथरोग सर्वेक्षणात लातूर जिल्हा राज्यात प्रथम...

ताज्या बातम्या

सरकारी कर्मचाऱ्याबाबत बोलले बावनकुळे #viral #marathinews

July 21, 2026

आंदोलनात दिसला औरंगजेबाचा फोटो…….. #viral

July 21, 2026

मनपाच्या सभेत अनंत जाधवानी अकुलवार यांना धारेवर धरले #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

खुशखबर जिल्हा रुग्णालयात कार्डियाक केअर युनिट सेवा……

July 21, 2026

‘एक विशेष बाब लिहून बी टू रद्दचा आदेश आला #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

वारी दरम्यान खासगी दवाखाने सुरू राहणार…… #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

राम मंदिर देणगीचे राजकारण करू नका #viral#nationalnews

July 21, 2026

*सावधान ही दृशे तुम्हाला विचलित करू शकतात* समृद्धी महामार्गावर एकाच कुटुंबातील तिघांसह सहाजण ठार

July 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0990885

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!