मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या 13 विविध प्रश्नाच्या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येथील प्रांत कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र युवा आघाडीचे अध्यक्ष अॅड राहुल घुले,जिल्हाध्यक्ष युवराज घुले, तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार, संतोष पुजारी, श्रीशैल हत्ताळी, निसार पाटील , निलकंट साखरे, रामगोंडा पाटील ,आबा खांडेकर हे उपस्थित होते.
त्यामध्ये म्हैसाळ योजनेचे पाणी लाभ क्षेत्रातील गावांना तात्काळ सुरू करावे, राजकीय चालढकलीत अडकलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यतेसह निधी उपलब्ध करून लवकरात लवकर काम सुरू करावे.खरीप हंगामात पिक विमा भरलेल्या सुमारे 68 हजार 78 शेतकऱ्यांना 25 % अग्रीम मिळावे,शेतकऱ्याकडील सर्व कर्जाची सक्तीने सुरू आहे.