जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ६० किमी अंतरावर असलेले हाजराफॉल नैसर्गिक पर्यटनस्थळ व धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर हजेरी लावतात. दिवसेंदिवस प्रसिद्धीचे शिखर गाठत असलेल्या या पर्यटनस्थळाला वर्षभरात जवळपास २५ हजारांच्या घरात पर्यटकांनी भेट दिली असून यातून २५ लाख रुपयांचा महसूल दिला आहे. केवळ गोदिया जिल्ह्यातूनच नव्हे, तर मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यांतील आसपासच्या जिल्ह्यांतूनही वर्षभर या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी एक वेगळा अनुभव असतो. हाजराफॉल येथे वर्षभर पर्यटक येतात. मात्र, विशेषतः जून ते जानेवारी या कालावधीत हाजराफॉल येथे पर्यटकांची खूप गर्दी असते.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...