देशातील बँकांकडे तब्बल ३५ हजार कोटी रुपये पडून असल्याची माहिती नुकतीच आली होती. आता एलआयसीकडे तब्बल २१ हजार ५०० कोटी रुपये पडून आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील रक्कम बेवारस असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मागच्या वर्षी एलआयसीचा आयपीओ आला, त्यावेळी ही माहिती समोर आली होती. एलआयसीने कागदपत्रांमध्ये सप्टेंबर २०२१ पर्यंत २१ हजार ५३९ रुपये अनक्लेम्ड असल्याचे नमूद केले होते. दावा न केलेली रक्कम विमाधारकाला शोधता यावी, यासाठी एलआयसीने एक टूल दिले आहे.
एलआयसीने दिलेल्या टूलमध्ये माहिती शोधण्यासाठी एलआयसीच्या संकेतस्थळावरील कस्टमर सर्व्हिस सेक्शनमध्ये जावून अनक्लेम्ड अमाऊंट ऑफ पॉलिसी होल्डर्सवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या पॉलिसीशी निगडीत माहिती भरावी मग सबमिट केल्यानंतर डिटेल्स येतील. त्यानंतर केवायसी अपडेट करुन आपल्या हक्काच्या रकमेवर दावा करता येतो. पुढे एलआयसीने जारी केलेली अमाऊंट खात्यावर जमा होईल. एलआयसीकडे तब्बल २१ हजार ५०० कोटी रुपये पडून आहेत.
बँकांकडे ३५ हजार कोटी रुपये होते पडून
मागच्या दहा वर्षांमध्ये बँकांमध्ये ३५ हजार कोटी रुपये पडून होते. पब्लिक सेक्टरमधील बँकांनी नुकतीच ३५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम रिझर्व्ह बँकेकडे सुपूर्द केली. या पैशांचा कुणीही मालक नाही की कुणीही त्यावर दावा केलेला नाही. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने संसदेत सांगितले की, सरकारी बँकांनी फेब्रुवारी महिन्यात रिझर्व्ह बँकेला ३५ हजार १२ कोटी रुपये सुपूर्द केले. या रकमेचा दावेदार कुणीच नव्हते.