पंढरपूर – श्री संत शिरोमणी चोखामेळा यांचे १६ वे वंशज ह.भ.प माधव सीताराम सर्वगोड महाराज यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांच्या मूळ गावी पंढरपुर येथे निधन झाले.त्यांच्यावर सोमवारी पंढरपूर येथील भूवैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पाश्चात पत्नी,दोन मुले, तीन मुली आणि सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
संत चोखामेळा यांनी आपल्या अभंगातून सामाजिक विषमतेवर प्रहार करत विठ्ठलभक्तीच्या माध्यमातून समानता व आत्मविकासाचा संदेश दिला. चोखोबा हे वारकरी परंपरेतील एक महत्त्वाचे संत असून त्यांनी अस्पृश्यता झुगारून भक्तीमार्गात स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले. त्यांचे जीवन आणि शिकवण आजही वारकरी संप्रदायासाठी प्रेरणास्थान आहे. आशा त्यांच्या शिकवणीवर त्यांचे सोळावे वंशज मानले जाणारे ह.भ.प माधव महाराज सर्वगोड यांनी काम करण्याचा प्रयत्न केला होता.



























