सोलापूर – श्री आदी जांबमुनी मोची समाज मध्यवर्ती रथोस्तव समितीचे नुतन अध्यक्ष निवडीचे बैठक जांबमुनी मोची समाजचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली होऊन श्री शाम म्हेत्रे यांची सन 2025 – 2026 करिता जांबमुनी मोची समाज मध्यवर्ती रथोस्तव समितीचे अध्यक्ष म्हणून एक मताने निवड करण्यात आली.
जांबमुनी मोची समाज मध्यवर्ती रथोस्तोव समितीच्या वतीने मिरवणूक मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरी करण्याचे बैठकीत ठरले. यामध्ये पारंपारिक लेझीम डान्स ग्रुप लाठीकाठी झांज पथक रामायण महाभारत मंदिर देखावे करून साजरा करण्याचे ठरले
यावेळी माजी महापौर संजय हेमगड्डी, प्रा. नरसिंह आसादे, नागनाथ कासलोलकर, सिद्राम कामटी, बसवराज म्हेत्रे, रतिकांत कमलापुरे, शानराव साळवे, करेप्पा जंगम, अंबादास करगुळे आदी उपस्थित होते.

















