सोलापूरमध्ये वयाची साठी पार केलेल्या मात्र मनाने तरुण असलेल्या हरिभाई देवकरण शाळेतील माजी विद्यार्थ्यांकडून रंगपंचमी साजरी केली जातेय. आम्ही वयाची साठी पार केली आहे. मात्र मनाने आम्ही अजूनही ठणठणीत आहोत आणि आम्ही दर रविवारी भेटतो. आज रंगपंचमी असल्याने एकत्रित होळी आणि रंगपंचमी साजरी केली. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मुंबई, पुणे यासह राज्याच्या विविध भागातून आज आम्ही इथे रंगपंचमी साजरी करण्यासाठी आलोय. हरिभाई देवकरण शाळेतील दहावीच्या 1978 च्या बॅचचे सर्व विद्यार्थी एकत्रित जमलो आहोत, असं रंगपंचमी खेळण्यासाठी जमलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी म्हटलं आहे. आमचं तरुणांना एकच सांगणं आहे की, मोबाईलमधून बाहेर पडा आणि मैदानावर येऊन आपले सण-उत्सव साजरे करा. आगामी काळात जास्तीत जास्त होळी रंगपंचमी साजरी करण्याचा आम्ही संकल्प करतो, असंही ते म्हणाले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

















