सोलापूर – महानगरपालिकेच्या निवडणुकी करिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास मंगळवारी दी. २३ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वा सुरुवात केली. शहरातील अक्कलकोट रोड वरील ओंकार पार्क मधील अस्मिता व्हीजन सभागृहात मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला या विभागातून १२२ जणांनी मुलाखती दिल्या.
कालावधी कमी असल्याने एकाच दिवसात मुलाखती पुर्ण करण्यासाठी अशोक चौक शिवसेना भवन येथे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. अजय दासरी यांच्या नेतृत्वाखाली देखील विभागून १०२ उमेदवाराच्या मुलाखती घेतल्या गेल्या. त्या पॅनेल मध्ये प्रताप चव्हाण, दत्ता गणेशकर, रमेश चौगुले, सदानंद येलूरे, नाना मोरे, बाळासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते.
मुलाखती समयी समितीला जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, लोकसभा क्षेत्र प्रमुख दीपक गायकवाड व माजी जिल्हा उपप्रमुख व जेष्ठ शिवसैनिक प्रकाश वानकर आदिनी देखील सदिच्छा भेट देऊन उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. शिवसेना भवनातून अधिकृतरित्या जाहीर केलेल्या निवडणूक समन्वय समितीच्या वतीने इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या.
उमेदवारांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले होते. ढोलीबाजा, फटाक्याची अताषबाजी, गगनभेदी घोषणांची गर्जना करत, भगवे फेटे, शेले परिधान करून व हाती मशाल चिन्ह घेऊन उमेदवार मुलाखतीसाठी वाजत गाजत उत्साहात दाखल झाले होते. शिवसेना जिंदाबाद, स्व.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अमर रहे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आगे बडो, आशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. पक्षाच्या समन्वय समितीने देखील भगवी शाल व पुष्पगुच्छ देऊन तर महिलां उमेदवारांना हळदीकुंकवाचे वाण देऊन स्वागत केले. यावेळी उमेदवारांमध्ये प्रचंड आत्मविश्वास व उत्साह दिसून आला.
समितीने दिवसभरात 224 जणांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये जुन्या निष्ठावंत शिवसैनिका सह डॉक्टर, वकिल, आय.टी. क्षेत्रातील उच्चशिक्षित उमेदवाराचा समावेश होता. विशेष म्हणजे महिला उमेदवारानी मोठे शक्ती प्रदर्शन केल्याचे दिसून आले.
या समितीचे प्रमुख पुरुषोत्तम बरडे, शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष पाटील, महानगर प्रमुख दत्ता माने, जिल्हा समन्वयक दत्तात्रय वानकर, शहर प्रमुख धाराशिवकर , महिला जिल्हा संघटिका प्रिया बसवंती, युती सेनाप्रमुख पूजा खंदारे, उपशहरप्रमुख जयंत कदम लोकसभा क्षेत्र महिला संघटिका शशिकला चिवडशेट्टी, महानगर क्षेत्र प्रमुख शरणराज केंगनाळकर, महिला शहर संघटिका स्वाती रुपनर, प्रिती नायर, विधी व न्यायसेनेचे जिल्हा अध्यक्ष एडवोकेट सुरेश गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

























