शहरवासीयांच्या मागणीनुसार माॅडेल रेल्वे स्थानकावर आहार रेल कोच रेस्टाॅरंटचे काम पूर्ण झाले आहे. एसी कोचला रेस्टाॅरंटमध्ये परिवर्तीत करण्यासाठी स्टार फेब्रिकेशनच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम केले. माॅडेल रेल्वे स्थानकावर पाण्याची बाॅटलीही मिळत नाही. कारण आजवर तेथे खाद्यपदार्थ विकण्याची सोयच नव्हती. त्यामुळे प्रवाशांना सुमारे अर्धा कि.मी.लांब येऊन खाद्यपदार्थ, पाण्याची बाटली आत घेऊन जावी लागत होती.
तसेच महाग खाद्यपदार्थही मिळायचे. परंतु, रेल कोच आहार रेस्टाॅरंट मुळे त्यांचा वेळ व पैसा वाचणार आहे. रेस्टाॅरंटचा आतील भाग पंचतारांकीत हाॅटेलप्रमाणे सजवण्यात आला असून येथे ६४ जण बसण्याची सोय आहे. एवढेच नव्हे तर कोचच्या बाहेर टेबल लाऊन ३० जण नाश्ता करू शकतील, अशी सोय करण्यात आली आहे. येथे रेल्वेच्या नियमांनुसार खाद्य पदार्थ व थाळीही मिळण्याची सोय केली जात असल्याची माहिती स्टार फेब्रिकेशनच्या कर्मचाऱ्यांनी दिली