Wednesday, July 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पंकजा मुंडेंनी दुसऱ्यांदा पाठ फिरवली, आता देवेंद्र फडणवीस बीडमध्ये नवं नेतृत्त्व उभं करणार?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 17, 2023
in maharashtra
0
पंकजा मुंडेंनी दुसऱ्यांदा पाठ फिरवली, आता देवेंद्र फडणवीस बीडमध्ये नवं नेतृत्त्व उभं करणार?
0
SHARES
35
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमध्ये हजेरी लावलेल्या दोन कार्यक्रमांपासून पंकजा मुंडे जाणीवपूर्वक दूर राहिल्याचे सांगितले जात होते. या पार्श्वभूमीवर आता देवेंद्र फडणवीस आगामी काळात बीडमध्ये पंकजा मुंडे यांना शह देण्यासाठी जिल्ह्यात नवं नेतृत्त्व उभे करण्याच्या तयारीत असल्याची कुजबुज सुरु झाली आहे. यासाठी निमित्त ठरले आहे, ते म्हणजे, देवेंद्र फडणवीस आणि जयदत्त क्षीरसागर यांच्यात नुकतीच झालेली भेट.

संत वामन भाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. त्याचवेळी पंकजा मुंडे यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. तर दुसरीकडे जयदत्त क्षीरसागर यांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहात फडणवीसांशी असलेली जवळीक दाखवत येणाऱ्या काळातील बदलत्या राजकीय समीकरणाची झलक दाखवून दिली. 2024 मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी आपले पत्ते राजकीय सारीपाटावर फेकायला फडणवीसांनी सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे.सध्या या घटनांवरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

गोपीनाथ मुंडे यांचा वारसा सांगत असलेल्या पंकजा मुंडे यांचा बीड हा बालेकिल्ला समजला जातो.परळीतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांची जनतेशी असलेली नाळ तुटू लागल्याचं पाहायला मिळू लागलं.यापूर्वी सत्तेत मंत्रिपदावर असताना देखील मीच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असं म्हणत पंकजा मुंडेंनी फडणवीसांना शह दिला. त्यानंतर भाजपात त्यांचं राजकीय पतन सुरू झालं.ही बाब मात्र स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या तालमीत वाढलेल्या पंकजा मुंडे यांच्या कळलं असलं तरी वळलं. हवेत असलेल्या पंकजा मुंडे यांच्या बालेकिल्लाचा पाया जनसंपर्का अभावी खिळखिळा होऊ लागला. ज्या स्व. गोपीनाथराव मुंडेंच नाव घेतल्याशिवाय भाजपाला आजही कुठलंच पाऊल टाकता येत नाही. त्याच भाजपने स्व. मुंडे सारख्या मातब्बर नेत्यावर देखील पक्ष सोडण्याची वेळ आणली होती. हा इतिहास सर्वश्रुत आहे. काहींशी तशीच परिस्थिती पंकजा मुंडे यांची देखील केली जाऊ लागली त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.पक्षात घुसमट होत असली तरी राजकीय अडचणींपोटी अजूनही पंकजा मुंडे यांनी मोठा निर्णय घेतला नाही.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना पराभूत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी रसद पुरवली होती, अशी जोरदार चर्चा देखील राजकीय वर्तुळात केली गेली. पंकजा मुंडे या देवेंद्र फडणवीस ज्या व्यासपीठावर आहेत त्या व्यासपीठावर जाण्याचे टाळत आहेत. हे लक्षात न येण्या इतपत जनता दुधखुळी निश्चितच नाही. गहिनीनाथ गडावरील आजच्या कार्यक्रमाला देखील त्यांची अनुपस्थिती अनेकांना खटकली. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांचे वाढते दौरे ही बाब देखील खटकू लागली आहे. सर्वच बाजूंनी पंकजा मुंडे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी सुरू केल्याचं बोलले जाऊ लागला आहे. त्यांच्या वाढत्या दौऱ्याने पंकजा मुंडे यांच्या खिळखिळ्या झालेल्या बालेकिल्लाचे बुरुज ढासळायला फारसा वेळ लागणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात तरी पंकजा मुंडे यांनी जनतेत मिसळून काम करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

वडिलांच्या पुण्याईवर पंकजा मुंडेंची नौका राजकीय सागरात कधीच पैलतीरावर लागणार नाही, हे लक्षात घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पंकजा मुंडे यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून पक्षात येण्याची साद घातली गेली . त्याचवेळी आजच्या गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमात जयदत्त क्षीरसागर यांनी आवर्जून उपस्थिती लावली.त्यामुळे सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत नसलेले जयदत्त क्षीरसागर भाजपच्या वळचणीला गेले असल्याचे संकेत आज मिळाले.जयदत्त क्षीरसागर यांची बीड जिल्ह्यात अजूनही पकड मजबूत आहे. याचा फायदा पंकजा मुंडे यांच्या विरोधात बारामतीकरांना जबरदस्त शह देणारे मुरब्बी देवेंद्र फडणवीस निश्चितच घेतल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळात पंकजा मुंडे यांना सावध भूमिका घेत जनमानसात मिसळून आपला बालेकिल्ला मजबूत ठेवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे, असे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

Post Views: 109
Previous Post

कोयता गँगचा धुमाकूळ! मैदानावर झोपलेल्या ज्येष्ठ नागरिकावर कोयत्याने वार; रक्तबंबाळ होईपर्यंत वार !

Next Post

हि रेल्वे नाही ! हे आहे आहार द रेल कोच रेस्टोरंट…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
हि रेल्वे नाही ! हे आहे आहार द रेल कोच रेस्टोरंट…

हि रेल्वे नाही ! हे आहे आहार द रेल कोच रेस्टोरंट...

ताज्या बातम्या

त्या महिलेने चिठ्ठीत दिली मठ उडवण्याची धमकी #viral #marathinews #solapurnews

July 22, 2026

सरकारी कर्मचाऱ्याबाबत बोलले बावनकुळे #viral #marathinews

July 21, 2026

आंदोलनात दिसला औरंगजेबाचा फोटो…….. #viral

July 21, 2026

मनपाच्या सभेत अनंत जाधवानी अकुलवार यांना धारेवर धरले #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

खुशखबर जिल्हा रुग्णालयात कार्डियाक केअर युनिट सेवा……

July 21, 2026

‘एक विशेष बाब लिहून बी टू रद्दचा आदेश आला #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

वारी दरम्यान खासगी दवाखाने सुरू राहणार…… #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

राम मंदिर देणगीचे राजकारण करू नका #viral#nationalnews

July 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0991368

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!