सोलापूर – जिल्हयात सीना नदीच्या पुरामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकरीवर्ग, नागरीक यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
सदर बाधीत लोकांना मदतीचा हात म्हणून डॉ.व्ही.एम.मेडिकल कॉलेज कर्मचारी पतसंस्था मर्या, सोलापूर यांनी संस्थेचा २५-२६ या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित विविध कार्यक्रम करण्यासाठी निधी जमा केलेला होता त्यासुमरेदीड लाख रुपयांच्या निधीचा काही भाग हा संस्थेच्या वतीने मोहोळ तालुक्यातील सीना नदीलगतच्या शिरापूर, पिरटाकळी, शिंगोली येथील बाधीत कुटुंबीयाना तसेच वाडया वस्त्यावरील कुटुंबीयाना जीवनाश्यक वस्तु तांदुळ, तुरदाळ, तेल, मिठ, तिकट यांचे 254 किट घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले.
सदर वाटप कार्यक्रम संस्थेचे व्हा.चेअरमन बंडगर, सचिव फुटाणे, संचालक माशाळ, राऊळ, जेष्ट सभासदN शिंगाडे व संस्थेचे कर्मचारी यांनी पुर्ण केले आहे.






















