अक्कलकोट – महाराष्ट्र राज्य सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षा एमएच-SET २०२५ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागामार्फत गोवा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांतील विद्यार्थ्यांसाठी घेतल्या गेलेल्या परीक्षा मध्ये अक्कलकोट येथील डॉ. धानय्या कौटगीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल २६ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची गौरवशाली नोंद झाली आहे.
प्रा.शशिकांत कट्याप्पा कोळी हंजगी,ता. अक्कलकोट, प्रा.विनायक कलशेट्टी अक्कलकोट, प्रा. प्रीती केशेट्टी सोलापूर,प्रा. सीमा बिलुरे सोलापूर, प्रा. महेशकुमार बदने, सातारा, प्रा. इलाही इनामदार आठपाडी, प्रा. रणजित जगदीश भालेराव बार्शी, प्रा. सूर्यकांत वसंत क्षीरसागर विटा, प्रा. सूरज एम बार्शी,प्रा. सुनीता विश्वनाथ फुले पुणे,प्रा. अनुराधा सेलेनोफीले पुणे, प्रा. ज्योती शिवाजी ठाकरे सांगली, प्रा. सोनाली भगत मुंबई, प्रा. हर्षल सदाशिव चिंचगारे नागपूर,प्रा. मेघा गावडे संगमनेर, प्रा. शुभम भालेराव संगमनेर, प्रा. महेश विठ्ठल जाधव नांदेड, प्रा. पल्लवी वसंत बनसोडे छत्रपती संभाजीनगर, प्रा. गणेश सुनील उफादे लातूर,प्रा. सुनील एच धुळे,प्रा. वैशाली ईश्वर दवणे पुणे,प्रा. सुषमा कुलकर्णी धुळे,प्रा. रंजना राहुल बागल विटा, प्रा. रविकांत सोपान थोरवे इंदापूर,प्रा. कृष्णा रामचंद्र भोसले कोल्हापूर,प्रा. गोविंद शिवदास बोंबीलवाड लातूर असे २६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
डॉ. कौटगीमठनी देशातील विविध राज्यांतील ७९ वेळा सेट, नेट, टीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊन जागतिक विक्रम केला आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि प्रगल्भ ज्ञानाचा लाभ समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना मिळावा, या हेतूने ते यूट्यूबच्या माध्यमातून मोफत ऑनलाइन मार्गदर्शन देत आहेत. सध्या ५२,४०० विद्यार्थी त्यांच्या डिजिटल मार्गदर्शनाचा लाभ घेत आहेत. पेपर १ व २ साठी मराठी, इंग्रजी आणि कन्नड भाषांमध्ये १४०० उच्च-गुणवत्तेचे व्याख्यान व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आर्थिक परिस्थिती बिकट असलेले विद्यार्थी, गृहिणी, कामगार, शेतमजूर, मोटार मेकॅनिक अशा समाजाच्या विविध घटकांतील अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले आहे.डॉ. धानय्या कौटगीमठ यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी मिळविलेली ही यशस्वी घोडदौड अक्कलकोट तालुक्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. नुकतेच कर्नाटक सेट परीक्षेत ३०९ विद्यार्थी पास झाले होते आता पर्यंत १३५८ विद्यार्थी सेट नेट टी इ टी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
मी सांगली जिल्ह्यातील आठपाडी येथील मुस्लिम समाजातील मोटार मेकॅनिक आहे. मी नेहमी डॉ.धानय्या सरांची व्हिडिओ पाहत असल्याने मला प्रचंड प्रेरणा मिळाली असून इंग्रजी विषयात महाराष्ट्र सेट परीक्षात उत्तीर्ण झाला आहे.
– प्रा. इलाही इनामदार आटपाडी






















