सोलापूर – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आचारसंहिता कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग, यांची अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रांवर तसेच अवैध देशी-विदेशी मद्य विक्री, वाहतुक व अवैध धाब्यांवर कलम ६८ व ८४ नुसार धडक कारवाईत एकूण २९ लाख ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर यांनी सागर धोमकर विभागीय उपायुक्त, पुणे विभाग याच्या निर्देशानुसार व भाग्यश्री पं. जाधव, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर, जे. एन. पाटील प्र.उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, यांचे समवेत दि. २३ ते २६ डिसेंबर २०२५ या कालावधीत सोलापूर शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रांवर, अवैध देशी-विदेशी मद्य विक्री व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत एकुण ४२ गुन्हे नोंद करण्यात आले असुन ५० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईत २८, २९० ब.लि. रसायन, १४३४ ब.लि. हातभट्टी दारु, १७५.५८ ब. लि. देशी मद्य, १८ ब.लि. विदेशी मद्य, ११ ब.लि. बिअर, ७५ ब.लि. ताडी तसेच ०३ चारचाकी वाहन व ०४ दुचाकी वाहनांसह एकुण २९ लाख ५० हजार रुपयांचा प्रोव्हि. गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच या विभागाकडुन या कालावधीत अवैध मद्य विक्री करणाऱ्या व मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या एकूण ०७ ढाब्यांवर गुन्हे नोंदविण्यात आले असून एकुण २७ आरोपींवर कारवाई करण्यात आलेली आहे.
हॉटेल जगदंबा, हॉटेल यशराज ढाबा, हॉटेल राजवाडा ढाबा, विलास कोल्ड्रिंक्स, विजापुर रोड कंबर तलाव परिसरातील चायनिज सेंटर, हॉटेल वैष्णवी ढाबा अश्या ढाब्यांवर कलम ६८ व ८४ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. तसेच या पुर्वीही विनापरवाना ठीकाणी ढाबे, हॉटेल्स व कोल्ड्रिंक्स सेंटर मद्य विक्री व मद्य सेवन करणाऱ्यांवर कारवाई करुन रु,२५०००/- ते ३००००/- हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा मा, न्यायालयाकडुन ठोठावण्यात आली आहे. अशा प्रकारची धडक कारवाई पोलिस प्रशासन, महावितरण, महसुल विभाग इत्यादी अन्य विभागा सोबत संयुक्त कारवायावर भर देण्यात येत असुन या पुढेही अशाच प्रकारे कारवाई चालू राहणार असुन आचारसंहितेच्या पार्श्वभुमीवर या विभागाकडुन विषेश पथके नेमण्यात आली आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आचारसंहिता लागु झाल्यापासुन दिनांक १५ ते २६ डिसेंबर या कालावधीत एकुण १४१ गुन्हे नोंदविण्यात आले असुन १४४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच २० वाहनांसह एकुण ९२ लाख ६९ हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई निरीक्षक ओ व्ही घाटगे, राकेश पवार, पंकज कुंभार, सचिन भवड, तसेच दुय्यम निरीक्षक सर्वश्री राम निंबाळकर, धनाजी पोवार, सुखदेव सिद, सचिन शिंदे समाधान शेळके, सुदर्शन संकपाळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, संजय चव्हाण, जवान सर्वश्री आण्णा करचे, नंदकुमार वेळापूरे, वसंत राठोड, चेतन व्हनंगुटी, प्रशांत इंगोले, अनिल पांढरे, विनायक काळे, अण्णासाहेब फड, कपिल स्वामी, गजानन ढब्बे, तानाजी जाधव, पवन उगले, योगीराज तोग्गी, स्वप्निल आरमाळ, योगेश गाडेकर, पंढरीनाथ भुतेकर, मंगेश मारसिंग, केतन तानगावडे, महिला जवान शिवानी मुढे, वाहनचालक दिपाली सलगर, संजय नवले व दिपक वाघमारे यांनी पार पाडली.

























