Monday, November 2, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनातील डॉग शोला उत्स्फूर्त प्रतिसाद; तीनशेहून अधिक देशी-विदेशी श्वान सहभागी 

तरुण भारतbyतरुण भारत
December 28, 2025
in solapur
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – येथील श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात आयोजित डॉग शोला दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही  उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.तब्बल तीनशेहून अधिक देशी-विदेशी श्वानांचा यामध्ये सहभाग होता.होम मैदान येथे श्री सिद्धेश्वर देवस्थानच्यावतीने दि.२५ ते २९ डिसेंबर दरम्यान आयोजित श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनामध्ये तिसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत डॉग शोचे आयोजन करण्यात आले होते. या शोचे उद्घाटन देवस्थानचे विश्वस्त मल्लिनाथ मसरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष  प्रकाश वाले तसेच स्मार्ट एक्सपोचे संचालक सोमनाथ शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी फॅन्सी डॉग शो तसेच फॅशन डॉग शो या स्पर्धाही घेण्यात आल्या. त्याचबरोबर आठ ते 16 वयोगटातील मुलामुलींसाठी ज्युनिअर हँडलिंग कॉम्पिटिशन स्पर्धाही पार पडली. या स्पर्धांना देखील भरभरून प्रतिसाद मिळाला.

या प्रदर्शनामध्ये पॉमेडियन,सायबेरियन हस्की, गोल्डन रेट्रीवर जर्मन शेफर्ड,  लायब्रीडर, डॉबरमॅन, रॉटविलर,अमेरिकन गुली,ग्रेट डेन,डॉलमेशियन, सीझ्झू, लासाॲप्सो, केनकरसो, स्पॅनियल,बीगल, फ्रेंच गोल्डन,बुलडॉग, बॉक्सर,बेल्जियन मेलोनोईज,शायर टेरियर,पग आदी तसेच कॉरवॉन हाऊड, मुधोळ हाऊंड, पश्मी हाऊंड या देशी – विदेशी जातींच्या 24 प्रकारच्या श्वानांचा   समावेश होता. विशेष म्हणजे सीझ्झू,जातीच्या जवळपास पंचवीस श्वानांचा  यामध्ये विशेष सहभाग होता.डॉग शोमध्ये सहभागी या सर्व श्वानांच्या शरीराची ठेवण, डोळे, दात, उंची, केस, रंग, शेपटी, पायांची ठेवण या सर्व बाबींची परीक्षकांकडून तपासणी करण्यात आली.

या प्रदर्शनामध्ये सोलापूरसह, मिरज, सांगली, पंढरपूर,अकलूज,पुणे,लातूर,धाराशिव,बीड, परभणी तसेच कर्नाटकातील मुधोळ, विजापूर, बागलकोट   आदी जिल्ह्यांतील श्वानप्रेमी आपल्या प्राणांसह श्वानांसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात बेस्ट इंडियन ब्रीड,बेस्ट पपी इन शो, बेस्ट ज्युनिअर हँडलर, बेस्ट हँडलर यांची निवड करून त्यांना ट्रॉफी व रोख रक्कम तसेच डॉग फूड बॅगा देण्यात आल्या.

या स्पर्धेसाठी पेट्स वर्ल्ड अँड पेट गॅलरी सोलापूरचे आर्यन दळवी, स्वप्ना दळवी, शलवारी श्राफ, महेश माने, अभिजीत कम्पली यांच्यासह संगमेश्वर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून पुण्याचे संजय मु्थुर तर फॅशन डॉग शो  व  फॅन्सी डॉग शोचे परीक्षक म्हणून वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. सचिन देशमुख व स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. तृप्ती देशपांडे यांनी काम पाहिले. 

यांचेही लाभले सहकार्य 

ड्रल्स डॉग फूड कंपनी, कॉर्निव्हल डॉग फूड कंपनी, सिग्नेचर डॉग फुड कंपनी, बॉलर्स फूड कंपनी आदींचे या डॉग शो साठी सहकार्य लाभले. या कंपन्यांच्यावतीने स्पर्धेत सहभागी श्वानांना सॅम्पल डॉग फूड पॅकेट   देण्यात आले. 
कोट

आज  कॅट शोचे आयोजन

 श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे होम मैदान मैदान येथे आयोजित ५५ व्या कृषी प्रदर्शनात उद्या (रविवारी )  २८ डिसेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत कॅट शोचे आयोजन करण्यात आले आहे.हे प्रदर्शन पाहण्यासाठी  मांजर प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Post Views: 184
Previous Post

धाब्यांवरील धडक कारवाईत २९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त

Next Post

ग्रामदैवत श्री जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

ग्रामदैवत श्री जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम

ताज्या बातम्या

सांगोला महाविद्यालयात राष्ट्रीय संकल्प व एकता दिवस उत्साहात

सांगोला महाविद्यालयात राष्ट्रीय संकल्प व एकता दिवस उत्साहात

November 2, 2026

माळशिरस तालुका रास्त भाव धान्य दुकानदार महासंघातर्फे नवनिर्वाचित पुरवठा निरीक्षकांचा सत्कार

November 2, 2026
कॉलेज ऑफ फार्मसीचा जलतरणपटू शुभम अंगडीला पाच पदके

कॉलेज ऑफ फार्मसीचा जलतरणपटू शुभम अंगडीला पाच पदके

November 2, 2026
महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठेचे बळ

महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठेचे बळ

November 2, 2026
महापालिकेच्या ताफ्यात सात नवीन बोलेरो गाड्या दाखल

महापालिकेच्या ताफ्यात सात नवीन बोलेरो गाड्या दाखल

November 2, 2026

महाडीबीटी २.० पोर्टलच्या संथ कारभारामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली

November 2, 2026

जिल्हा परिषदेत फायलींच्या हाताळणीवर प्रश्नचिन्ह; आवक-जावक नोंदवही केवळ नावालाच?

November 2, 2026

विवाहितेला मारहाण करून सोन्याचे मंगळसूत्र लांबवले

November 2, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1456777

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!