सोलापूर : हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीने रविवारी सोलापूर येथील उमा मंदिर चित्रपटगृहात माता-भगिनींसाठी ‘द केरला स्टोरी 2’ या चित्रपटाचा विशेष मोफत शो आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत सुमारे ३०० माता-भगिनींना चित्रपट मोफत दाखविण्यात आला.
समाजातील मुलींमध्ये सामाजिक जागरूकता निर्माण करणे तसेच लव्ह जिहादसारख्या प्रकारांबाबत सतर्कता निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे हिंदुराष्ट्र सेनेचे शहरप्रमुख रवि गोणे आणि शहर संघटक आनंद मुसळे यांनी सांगितले.
चित्रपट सुरू होण्यापूर्वी उपस्थित माता-भगिनींनी “जय श्रीराम” तसेच “भारत माता की जय” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
चित्रपट पाहिल्यानंतर अनेक माता-भगिनी भावनिक झाल्या. यावेळी बोलताना शहरप्रमुख रवि गोणे यांनी, “आपल्या हिंदू धर्माचे महत्त्व ओळखा आणि लव्ह जिहादसारख्या प्रकारांना बळी पडू नका,” असे आवाहन केले.
तसेच शहर संघटक आनंद मुसळे यांनी, महिलांनी अशा प्रकारांपासून सतर्क राहून स्वतःचे संरक्षण करावे, असा संदेश दिला.
या कार्यक्रमाला हिंदुराष्ट्र सेनेचे अंबादास गोरंटला, विलास पोतू, श्रीधर आरगोंडा, विजय महिंद्रकर, प्रकाश आसादे, सागर कोळी, विजय गोणे,हणमंतू श्रीराम,अभिजीत अरळीकर, विनायक नामाजी, रुद्रशित्य गुरुकुलचे विवेक मिस्कीन , अभिषेक जेटगी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

























