श्रीपूर – येथिल कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात गाळपास आलेल्या ऊसाचे ३००० रु . प्रमाणे बील शेतकरी सभासदांचे खात्यावर जमा केले असल्याची माहिती चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी दिली . पुढे बोलताना ते म्हणाले की कारखान्याचे संस्थापक कै . सुधाकरपंत परिचारक यांनी आखून दिलेल्या मार्गावरून आम्ही वाटचाल करीत असून शेतकरी व कामगार हिताची बांधिलकी जपली जात आहे . यावेळी उपाध्यक्ष कैलास खुळे , कार्यकारी संचालक डॉ . यशवंत कुलकर्णी उपस्थित होते . या वेळी कार्यकारी संचालक डॉ . यशवंत कुलकर्णी यांनी आम्ही अत्यंत कमी कालावधीत म्हणजे ७५ दिवसात ७ लाख मे.टन . ऊसाचे गाळप केले असून कमी दिवसात जास्त ऊस गाळप करण्याचा उच्चांक निर्माण केला असल्याचे सांगून कारखान्याचे चेअरम प्रशांतराव परिचारक , व्हा.चेअरमन कैलास खुळे संचालक मंडळातील सर्व सदस्य व अधिकारी, कामगार यांच्या सहकार्याने हे शक्य झाल्याचे सांगितले .
तसेच या गळीत हंगामा मध्ये कारखान्याकडे सुमारे ११ लाख मे.टन ऊस क्षेत्राच्या नोंदी झाल्या होत्या. त्यामधील कारखान्याने आजपर्यंत ७ लाख मे.टन ऊस गाळप केला असून उर्वरित ऊसाचे गाळप वेळेत पूर्ण करणार असल्याचे सांगत कारखान्याकडे तोडणी वाहतूक करणाऱ्या तोडणी वाहतूक ठेकेदारांचीही बिले दिली असून कारखाना सरासरी प्रतिदिन १० हजार मे.टन प्रमाणे चालत आहे. कारखान्याने ६ लाख ४० हजार क्विं. साखर उत्पादन करुन १० .७०% सरासरी साखर उतारा मिळविला आहे. को-जनरेशन मधुनही ४ . २२ कोटी विज निर्मीती करुन २ .२० कोटी विज निर्यात केली आहे. आसवणी प्रकल्पामधूनही ६७ लाख लिटर इतके उत्पादन घेतले आहे. अशी माहिती डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी दिली.


















