बार्शी – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्यावतीने घेण्यात आलेल्या ‘सृजनरंग नियतकालिक स्पर्धा-२०२४-२५’ मध्ये येथील श्री शिवाजी महाविद्यालयाने विविध कला प्रकारांत एकूण दहा पारितोषिकांसह उत्कृष्ठ अंकासाठीचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
मराठी भाषेसाठी कथात्म लेखन (प्रथम) रत्नदीप वारगड, संस्कृत भाषेसाठी काव्यात्म लेखन (प्रथम) ऋषिकेश चौरे, कथात्म लेखन (प्रथम) मंजिरी कुलकर्णी, समीक्षात्मक लेखन (द्वितीय) नेहा देशमुख, हिंदी भाषेसाठी नाट्यात्म लेखन (प्रथम) पल्लवी यादव, समीक्षात्मक लेखन (तृतीय) श्रद्धा घाडगे तर इंग्रजी भाषेसाठी वैचारिक लेखन (प्रथम) स्वप्नाली मदने या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ठ अंकासाठीचे तृतीय पारितोषिक आणि सर्वसाधारण विजेतेपदासाठीचे उत्तेजनार्थ क्रमांकाचे पारितोषिक देऊन महाविद्यालयास गौरविण्यात आले.
सर्व विद्यार्थ्यांना लोककवी प्रशांत मोरे यांच्या हस्ते विद्यापीठाच्या सभागृहात सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर, प्र. कुलगुरु डॉ. लक्ष्मीकांत दामा, विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदार काळवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर विद्यार्थ्यांना मुख्य संपादक डॉ. रविकांत शिंदे, प्रा. विजया जगताप, डॉ. राहुल पालके, डॉ. श्रीराम वैद्य, प्रा. समाधान लोंढे, डॉ. विजय भांजे, डॉ. जयभीम शिंदे आदींचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव प्रकाश पाटील, सहसचिव अरुण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, प्राचार्य डॉ. अब्दुल शेख आदींनी अभिनंदन केले.
























