लहान वयातच तरुणांना हृदयविकाराचे झटके येण्याच्या घटना देशात वारंवार समोर येत आहेत. अशीच एक घटना पुन्हा समोर आली आहे. इथे जिममध्ये व्यायाम करत असलेल्या अवघ्या २४ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून या घटनेचा व्हिडिओदेखील समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल असं या तरुणाचं नाव आहे. तो हैदराबादच्या आफिसनगर पोलीस स्थानकात कॉन्स्टेबलच्या पदावर काम करतो. जिममध्ये व्यायाम करत असताना तरुण अचानक जमिनीवर कोसळला आणि त्यांनतर उठलाच नाही. विशालला जमिनीवर कोसळताना पाहून जिममधील इतर लोक धावत आले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
Yet another shocking case of a young man working out in the gym, simply collapsing; this is 24-year-old Vishal working as police constable at #AsifnagarPS police station #Hyderabad, who is suspected to have suffered a heart attack & could not be revived @ndtv @ndtvindia #GymDeath pic.twitter.com/rrUctZU5s0
— Uma Sudhir (@umasudhir) February 24, 2023
तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, कशाप्रकारे विशाल हा जिममध्ये व्यायाम करत होता. त्याने ११ पूशअप्स मारले आणि नंतर उठला. यानंतर त्याने लगेच स्ट्रेचिंग करण्यास सुरुवात केली आणि काही क्षणात खाली कोसळला. इतर जण धावत त्याच्याकडे गेले पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, हल्ली सहज लहान वयातली मुलांना गंभीर आजारांची लागण होताना आपण पाहतो. देशात मोठ्या प्रमाणात रोगराई वाढली आहे. अशात हृदयविकाराने मृत्यू होण्याच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. यामुळे तरुणांनी आपल्या आरोग्याकडे आणि आहाराकडे आणखी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
























