सोलापूर – राज्य शासनाच्या धर्तीवर महानगरपालिकेच्या सेवेतही राष्ट्रीय खेळाडूंना ५ टक्के आरक्षण देऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन नूतन नगरसेविका रोहिणी तडवळकर यांनी दिले.
भाजप क्रीडा प्रकोष्ठ, आरंभ फाऊंडेशन आणि विराट स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर भाजप शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर आणि ज्ञानेश्वर म्याकल यांची ‘स्वीकृत नगरसेवक’ पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना तडवळकर आणि म्याकल यांनी खेळाडूंना व क्रीडा क्षेत्राला भरीव मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. “शहरातील खेळाडूंना सरावासाठी दर्जेदार मैदाने कशी उपलब्ध होतील, याकडे विशेष लक्ष दिले जाईल. तसेच, पालिकेचे जलतरण तलावही खेळाडूंना सरावासाठी उपलब्ध करून दिले जातील,” असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
























