सांगोला – या वर्षीचा १५ मराठा लाईट इन्फंट्री (बुर्ज) चा ५४ वा वर्धापन दिन सांगोला येथील रामकृष्ण गार्डन व्हिला येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी रिटायर ब्रिगेडियर ए.के गुप्ते, सी.के.रमेश, एम.एम.विटेकर, कर्नल.मनोज चतुर्वेदी, ए.बी.जाधव, मोन्ट्रीया, एम.एस.राव तसेच कार्यरत कर्नल.एम.डी.मुथप्पा, प्रसाद पुरोहित, मयंक व १५ मराठा बटालियन मधील १९७१ च्या लढाई मधील वीर हिरो उपस्थित होते. यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी संतांच्या भूमीची आठवण म्हणून सर्वांना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देण्यात आली.
यावेळी जवळा येथील शाहीर सुभाष गोरे यांनी १५ मराठा बटालियनचे शहीद जवान पांडुरंग साळुंखे यांच्यावर पोवाडाचे सादरीकरण केले. त्यांना अक्षय चंदनशिवे यांनी साथ दिली. याप्रसंगी ए.के गुप्ते यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात कॅ.रावसाहेब साळुंखे यांनी सोलापूर जिल्ह्याचा इतिहास, संतांची भूमी व पर्यटना विषयी जिल्ह्याची ओळख डिजिटल मीडिया द्वारे सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभेदार विजयकुमार सावंत यांनी केले. आभार हवालदार आक्रुर शिंदे यांनी मानले. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आजी-माजी सैनिक, ऑफिसर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















