पंढरपूर – तालुका पोलिसांच्या कारवाईत ६५ एकर जॅकवेल भीमा नदी पात्र येथून (विसावा गावातून) अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा टेम्पोसह ६ लाख १५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांनी दिली.
या कारवाई संदर्भात माहिती देताना मुजावर यांनी सांगितले की, दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पासष्ठ एकर जॅकवेल येथून भीमा नदीपात्रातून गावातील भीमा नदी पात्रा लागत असलेल्या ठिकाणी अवैधरित्या अशोक लेंडँड कंपनीच्या टेम्पोमध्ये (क्र. एम.एच.११ डीडी ५८९९ टेम्पो चालक आदित्य मनोज माने (रा. पंढरपूर, रा.आंबेगाव ) हा आपल्या ताब्यात अवैधरित्या महाराष्ट्र शासनाच्या मालकीची भीमा नदी पात्रातील वाळू म्पोमध्ये चोरून घेऊन जात असताना त्यास विसावा तीन रस्ता चौक येथे ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पंढरपूर तालुका पोलिसांनी आदित्य मनोज माने याच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम ३०५,३०३ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला असून त्याच्याकडून वाळू व अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो असा एकूण सहा लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतल्याचे सांगितले.
दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, येथील उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे, पोलीस हेडकॉन्स्टेबल मंगेश रोकडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल अभिमन्यू गरड, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुहास देशमुख, दीपक भोसले,पोलीस कॉन्स्टेबल संजय गुटाळ, सागर गवळी, विजयकुमार आवटी, पोलीस चालक चाटे, विलास घाडगे, हासन नदाफ यांच्या पथकाने केली.

























